भोपाळ (मध्य प्रदेश):  भोपाळमध्ये खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीचा व्हिडिओ माझाच्या हाती लागला आहे. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास भोपाळच्या सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या 8 अतिरेक्यांना भोपाळपासून 10 किलोमीटरवर गाठून कंठस्नान घालण्यात आलं. त्यावेळी तिथं हजर असलेल्या एका अज्ञाताने अतिरेक्यांचा खात्मा करतानाचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

या व्हिडिओमध्ये मृत दहशतवादी दिसत असून त्यांच्याजवळ हत्यारंही सापडली आहेत. खेजडा गावातील लोकांनी मोबाइलमध्ये हा व्हिडिओ शूट केला आहे.

अचारपुरा गावात पोलिसांनी जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना घेरलं. त्यानंतर दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र, शरण येण्यास नकार दिल्याने पोलिसांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

पोलीस चकमकीत ठार झालेले दहशतवादी:

मोहम्मद खालिद अहमद

मुजीब शेख

मेहबूब गुड्डू

जाकीर हुसैन सादीक

अमजद

मोहम्मद सालिक

माजिद खालिद

आणि अकील खिलची

सिमीचे 8 दहशतवादी रात्री साडेतीनच्या सुमारास भोपाळ सेंट्रल जेलमधून पळाले होते. यावेळी त्यांनी जेलमधील सुरक्षारक्षकाचा गळा चिरुन त्याची हत्या केली आणि चादरीची रस्सी बनवून जेलची भिंत ओलांडली होती.

दहशतवादी फरार झाल्याने भोपाळ सेंट्रल जेलच्या अधीक्षकांसह तिघांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर शहरभर हाय अलर्ट जारी करुन, पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. पळालेल्या दहशतवाद्यांचा तपास अत्यंत वेगाने सुरु करण्यात आला होता.

 

सिमी : स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया

सिमी (Students Islamic Movement of India) ही दहशतवादी संघटना आहे. 25 एप्रिल 1977 रोजी अलिगढमध्ये ‘सिमी’ची स्थापना झाली. 2001 साली सरकारने या संघटनेवर बंदी आणली. आतापर्यंत मध्यप्रदेशातून सिमीचे सर्वात जास्त दहशतवादी अटक करण्यात आले आहेत.

VIDEO: