कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल बंगळुरु: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने, तिथे आता घोडेबाजार सुरु झाला आहे.


भाजपकडून जेडीएसच्या आमदारांना प्रत्येकी 100 कोटी रुपये आणि मंत्रिपदाचं लालूच दाखवलं जात आहे, असा गंभीर आरोप जेडीएस नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी केला आहे.

ते आज बंगळुरुमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

"मला दोन्ही बाजूची ऑफर आहे. मात्र 2004 - 2005 मध्ये मी भाजपसोबत गेल्याने, माझ्या वडिलांच्या कारकिर्दीवर काळा डाग पडला. देवाने मला तो डाग पुसण्याची संधी दिली आहे. मी आता काँग्रेससोबत जाणार आहे", असं कुमारस्वामी यांनी सांगितलं.

याशिवाय तुम्हाला भाजपचे कर्नाटक प्रभारी प्रकाश जावेडकर भेटले होते का? या प्रश्नावर कुमारस्वामी म्हणाले, कोण जावडेकर? ते सदगृहस्थ कोण आहेत?

कुमारस्वामींनी कालच काँग्रेसच्या पाठिंब्यासह 116 आमदारांसकट सत्तास्थापनेचा दावा राज्यपाल वजुभाई वालांकडे केला आहे.

भाजपकडून फोडाफोडी

सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला 8 जागा कमी पडत आहेत. त्यामुळे साहजिकच भाजपकडून अन्य पक्षाच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी भाजपकडून विविध ऑफर दिल्या जात असल्याचा दावा काँग्रेस आमदारांनी केला आहे.

येडियुरप्पा विधीमंडळ नेते

भाजपने येडियुरप्पांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती केली. त्यामुळे येडियुरप्पा राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी येडियुरप्पांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं, तर उद्याच बंगळुरुत त्यांचा शपथविधी होईल.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018

  • भाजप 104

  • काँग्रेस 78

  • जनता दल (सेक्युलर) 37

  • बहुजन समाज पार्टी 1

  • कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1

  • अपक्ष 1


संबंधित बातम्या

कर्नाटकात भाजपचा रडीचा डाव?  

कर्नाटक LIVE : मी आता काँग्रेससोबत जाणार : कुमारस्वामी  

काँग्रेसच्या 7 लिंगायत आमदारांवर भाजपची मदार  

कर्नाटकात रिसॉर्ट पॉलिटिक्स, काँग्रेसकडून 100 रुम बूक  

कर्नाटक: भाजप आज सत्ता स्थापनेचा दावा करणार 

कर्नाटकात ट्विस्ट: सर्वात कमी जागा, तरीही जेडीएसचा मुख्यमंत्री? 

खरे किंगमेकर तर कर्नाटकचे राज्यपालच!  

कोण आहेत कुमारस्वामी?