बंगळुरु : कर्नाटकात रिसॉर्ट पॉलिटिक्सला सुरुवात झाली आहे. फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसने ईगल्टन रिसॉर्टमध्ये 100 रुम बूक केल्या आहेत, जिथे काँग्रेसच्या आमदारांना ठेवलं जाईल. भाजपने काही पाऊल उचलण्याअगोदरच काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे.


विशेष म्हणजे गुजरातमध्ये अहमद पटेल यांच्यावेळी जी राज्यसभेची निवडणूक झाली होती, त्यावेळीही याच रिसॉर्टमध्ये आमदारांना ठेवण्यात आलं होतं. कर्नाटकात सत्तेचा पेच निर्माण झाल्यानंतर भाजप, काँग्रेस आणि जेडीएसकडूनही सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे.

भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार

कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी आज विधीमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत येडियुरप्पांची विधीमंडळ नेते म्हणून निवड होईल आणि त्याबाबतची माहिती राज्यपालांना दिली जाईल. म्हणजेच भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाईल.

मात्र भाजपकडे बहुमतासाठी 8 जागांची कमी आहे.

काँग्रेस-जेडीएस आघाडी

दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने सर्वात कमी जागा मिळालेल्या जेडीएसला पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर जेडीएस नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.

त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस मिळून सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला आहे.

या दोन्ही पक्षांचे मिळून काँग्रेस 78 + जेडीएस 38 = 116 आमदार होतात.

त्यामुळे यांची संख्या भाजपपेक्षा जास्त होते.

त्यामुळे आता राज्यपाल कोणता निर्णय घेतात, याकडे अवघ्या कर्नाटकसह देशाचं लक्ष लागलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018

भाजप 104

काँग्रेस 78

जनता दल (सेक्युलर) 37

बहुजन समाज पार्टी 1

कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1

अपक्ष 1

एकूण 222

संबंधित बातम्या :

कर्नाटक LIVE: आमदार फोडण्यासाठी ED, IT ची धमकी, काँग्रेसचा आरोप


कर्नाटकात भाजपची काल रात्री एक जागा कमी झाली, आज वाढली!


कर्नाटकच्या विजयाचा आनंद, मात्र वाराणसीच्या दुर्घटनेने मन हेलावलं : मोदी


कर्नाटक: भाजप आज सत्ता स्थापनेचा दावा करणार


काँग्रेसचे 7, जेडीएसचे 4 आमदार भाजपच्या संपर्कात?