नवी दिल्ली: नोटाबंदीच्या मुद्यावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला.


नोटाबंदी हा हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच आपल्याला लोकसभेत बोलू दिलं जात नसल्याचं त्यांनी म्हटलं.

नोटबंदी घोटाळ्यामुळे पंतप्रधान लोकसभेत येण्यास घाबरत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.

"मी लोकसभेत बोलणार आहे, तिथे सगळं स्पष्ट बोलेन. सरकार चर्चेतून पळ काढत आहे. जर त्यांनी मला बोलू दिलं नाही, तर तुम्ही पाहाल कसा भूकंप येईल.  आम्ही एक महिन्यापासून नोटबंदीवर चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. 'दूध का दूध, पाणी का पाणी' व्हायलाच हवं", असं राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान देशभर भाषण करत सुटलेत, पण त्यांना लोकसभेत येण्यास भीती का वाटते, असा सवाल राहुल गांधींनी केला.

दरम्यान, आज लोकसभेत राहुल गांधी बोलणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.