पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज समोरासमोर 30 मिनिटे बैठक चालली. उद्धव ठाकरे पंतप्रधान निवासस्थानी पोहोचल्यानंतर लगेच ही बैठक सुरु झाली. नंतर मंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बैठकीत बोलविण्यात आले. शिवसेना सूत्रांच्या म्हणण्यानुसार या बैठकीचा अर्थ म्हणजे भाजपने शिवसेनेला जिथे सोडले, आम्ही अजूनही तिथे उभे आहोत, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, आम्ही भाजपला सोडलं नाही, आम्ही वचनभंग केला नाही, काही लोक मोठे भाऊ आणि धाकटा भाऊ यांच्यातली दरी रुंदावत आहेत, आम्ही अजूनही तिथेच आहोत. म्हणजे आज पुन्हा भाजप आणि जर शिवसेनेची युती झाली तर तेच सूत्र पुन्हा लागू होईल जे मातोश्रीवर बसून 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आम्हाला सांगितले होते. म्हणजे प्रथम शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि नंतर भाजपला मुख्यमंत्री पद मिळेल, दोघांनाही समान कार्यकाळ मिळेल.


जग नक्कीच विचारेल की 30 वर्षांच्या मैत्रीनंतर वेगळे झालेले खाजगीत भेटल्यानंतर काय झालं?. ते विचारतील की जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. तर उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्या बैठकीत काय झाले. उद्धव ठाकरे यांच्या उत्तरामुळे या प्रश्नाचे गूढ आणखीनच गडद झाले.


काय म्हणाले मुख्यमंत्री?
आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही. पण, याचा अर्थ असा नाही की आमचं नातं तुटले आहे. मी कोणत्याही नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नाही. म्हणून मी पंतप्रधानांना स्वतंत्रपणे भेटलो तर त्यात काहीही चुकीचे असू नाही, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिलंय.


शिवसेना सूत्रांनुसार..
या बैठकीचा अर्थ म्हणजे जिथे भाजपने सोडलं तिथेचं शिवसेना अजूनही उभी आहे. शिवसेनेने ना भाजप सोडली ना, आश्वासन सोडले. शिवसेनेनेही हिंदुत्वाचा अजेंडाही सोडला नाही. आजही जर ते दोघे एकत्र आले तर फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्मुला कायम राहिल. म्हणजेच शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि नंतर भाजपला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद. हेच सुत्र मातोश्रीमधील बैठकीमध्ये ठरलं असल्याचं शिवसेना सांगत आहे.


असे म्हणतात की युद्ध आणि प्रेमामध्ये प्रत्येक गोष्ट योग्य असते. आपण हे थोडे वाढवल्यास राजकारणामध्येही सर्व काही न्याय्य मानले जाते. म्हणूनच कदाचित शिवसेनेने भाजपबरोबर निवडणुका लढवल्या असतील पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर मुख्यमंत्री झाले. उद्धव यांच्यावर हल्ला करण्याची भाजप संधी सोडत नाही आणि पंतप्रधान मोदींवर शिवसेनेकडूनही टीका होत असते. पण या दोघांदरम्यान पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधी लक्ष्मण रेखा ओलांडली नाही.


कोरोनाशी लढा देताना त्यांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले, त्या पंतप्रधान मोदींच्या विधानावरून तुम्हाला हे समजू शकेल. आता ही खाजगीतील बैठक हे देखील सांगते की पंतप्रधान जर पवारांना खाजगीत भेटू शकतात तर उद्धव यांची अशीच भेट घेऊन दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचाही संदेश दिला आहे.