मुंबई : कोरोनाची लक्षणे दिसली तरी आजही घाबरून  अनेकजण डॉक्टरांकडे जाण्याचे टाळतात. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे सतत प्रशासनाकडून आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते.   या दरम्यान तीन वर्षाच्या नागलँड येथील चिमुकलीने  आपल्या कृतीतून सोशल मीडियावर अनेकांची मने जिंकली आहे. 


 नागालँड हे दुर्गम राज्य. या राज्यातल्या झुन्हेबोटो जिल्ह्याच्या घठाशी तालुक्यातल्या हेबोलिमी हेल्थ सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. दी मीरंग एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांची एक मुलगी हेल्थ सेंटरमध्ये आली. लिपवी या मुलीचे नाव. लिपवीमध्ये सर्दी आणि फ्लूची लक्षणे दिसू लागली. तिचे आई- बाबा शेतीत कामावर गेले असल्याने तिने स्वतःच आरोग्य व आरोग्य केंद्राकडे तपासणीसाठी जाण्याचे ठरविले. विशेष म्हणजे कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन ही  चिमुरडी मास्क  घालून आरोग्य केंद्रात पोहचली.  जेव्हा लिपवा रुग्णालयात पोहचली तेव्हा तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना तिचे नवल वाटले. 


लिपवीचा डॉक्टरांसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वांनी तिच्या या कृतीचे भरभरून कौतुक केले आहे. बेंजामिन येप्थोमी (Benjamin Yepthomi) यांना देखील या फोटो शेअर करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी मुलगी आरोग्य केंद्रातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये येप्थोमी म्हणाले,  जेव्हा मोठी माणसं कोरोनाची चाचणी करून घेण्यास किंवा लसीकरण करून घेण्यास टाळाटाळ करताना आपण पाहतो, तेव्हा लहानग्या, निरागस लिपावीकडे पाहून दिलासा मिळतो. जबाबदारीने वागणं ही काळाची गरज आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केले आहे. 


 






या ट्विटला आतापर्यंत दहा हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. 1 हजाराहून अधिक लोकांनीही हे रीट्वीट केले आहे. या फोटोला नेटिझन्लकून खूप प्रेम मिळत आहे. बरेच लोक कमेंट करून छोटी लिपवीची स्तुती करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, बरेच   स्वत: चाचणी आणि लसीकरण करण्यापासून दूर जात आहेत, तर लहान लिपवी तिच्या कृतीतून सर्वांना मार्ग दाखवत आहे. जबाबदार असणे ही काळाची गरज आहे. दुसर्‍या नेटकऱ्याने  लिहिले, तरुण वयात एवढी मोठी जबाबदारी. बरेच प्रेम आणि आशीर्वाद. याला देशाचा जबाबदार नागरिक म्हणतात. यावर येफ्थोमीने उत्तर दिले, हे गावातच आहे, ते घरापासून चालण्याचे अंतर आहे.