VIDEO : स्मोकिंग करणारा हत्ती कधी पाहिलाय का?
एबीपी माझा वेब टीम | 27 Mar 2018 01:02 PM (IST)
कर्नाटकातल्या नागरहोल राष्ट्रीय उद्यानातला हत्ती स्मोकिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विनय कुमार या वनाधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ काढला.
बंगळुरु : हत्ती कधी स्मोकिंग करताना दिसू शकतो याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. मात्र कर्नाटकातल्या नागरहोल राष्ट्रीय उद्यानातला हत्ती स्मोकिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कर्नाटकमधील नागरहोल राष्ट्रीय उद्यानातील आहे. विनय कुमार या वनाधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ काढला. जंगलातून जात असताना त्यांना हा प्रसंग दिसला आणि त्यांनी तो आपल्या कॅमेरात कैद केला. हत्ती एक एक कोळशाचा तुकडा सोंडेने तोंडात घेताना दिसतोय. त्याचाच हा धूर हत्तीच्या तोंडावाटे बाहेर पडताना दिसत आहे. कोळशामध्ये कोणतंही पौष्टीक मूल्य नसतं, मात्र कोळशात असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे प्राणी त्याकडे आकर्षित होतात. पाहा व्हिडीओ :