तिरुअनंतपूरम: एका रेडिओ जॉकीची स्टुडिओत घुसून हत्या केल्याची थरारक घटना केरळमध्ये घडली. राजेश उर्फ रसिकन राजेश असं हत्या झालेल्या 36 वर्षीय आरजेचं नाव आहे.
केरळची राजधानी तिरुअनंतपूरमजवळ मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली.
तीन हल्लेखोर रात्री उशिरा मदवूर इथल्या स्टुडिओत घुसले. त्यांनी स्टुडिओत असलेल्या राजेश आणि त्याचा मित्र कुट्टनवर हल्ला केला.
या हल्ल्यात रसिकन राजेश नावाने लोकप्रिय असलेल्या आरजे राजेशचा मृत्यू झाला. तर कुट्टनवर गंभीर जखमी आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रसिकन राजेश हा रेडिओ जॉकीसह लोकगायकही होता.
पोलिसांच्या मते, मध्यरात्री दोनच्या सुमारास राजेश आपला शो आटोपून स्टुडिओतून बाहेर पडण्याच्या तयारीत होता. मात्र त्याचवेळी हल्लेखोरांनी स्टुडिओत घुसून, राजेशवर हल्ला चढवला.
यावेळी स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र तत्पूर्वीच राजेशचा मृत्यू झाला.
राजेश मिमिक्रीसाठीही फेमस होता.