Delhi News : प्रजासत्ताकदिनी  राजधानी दिल्लीत हल्ला होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिल्लीला हाय सिक्युरिटी अलर्ट जारी केला आहे. एजन्सींना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी दिल्लीत मोठा दहशतवादी कट रचण्याचा विचार करत आहेत.  प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 20 जानेवारीपासून यूएवी, पॅराग्लायडर आणि गरम हवेच्या फुग्यांवर बंदी घातली आहे. ही बंदी 15 फेब्रुवारीपर्यंत कायम असणार आहे.  याबाबत दिल्ली पोलिसांना सतर्क केले आहे. 


पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हँगग्लायडर, यूएवी, यूएएस, मायक्रोलाईट विमान, रिमोट संचालित विमान, गरम हव्याचे फुगे, क्वाडकॉप्टर, विमान किंवा इतर हवाई मार्गाने हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
पोलिस उपायुक्त दीपक यादव म्हणाले, प्रजासत्ताकदिनी संपूर्ण दिल्लीत सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांसह, नॅशल सिक्युरिटी गार्डच्या टीम देखील तैनात करण्यात आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी अँटी ड्रोन मॅनेजमेंट सिस्टिम लावण्यात आली आहे


ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात येणार आहे. जवळपास 14 हजार जणांना कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात येणार आहे. त्यापैकी चार हजार तिकिट हे नागरिकांसाठी असणार आहे. दिल्ल पोलिसांनी थ्री लेव्हलची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.


प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोका


प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांच्या गोपनीय अहवालातून समोर आलीय. इंडिया टुडेनं हे वृत्त दिलं आहे. देशाच्या प्रजासत्ताक दिनी सुरक्षेसाठी यंत्रणा आणखी सतर्क झाल्या आहेत. भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला आशियायी देशांतील मोठ्या नेत्यांना आमंत्रित करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कजाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या राष्ट्रांच्या मान्यवरांचा समावेश असेल. या अहवालात असंही सांगण्यात आलं आहे की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या क्षेत्राबाहेरील गटांकडून हा कट रचला जाऊ शकतो. या गटांचं उद्दिष्ट मोठ्या पदावरील मान्यवरांना लक्ष्य करणं आणि सार्वजनिक मेळावे, महत्त्वपूर्ण आस्थापने आणि गर्दीच्या ठिकाणी दहशत निर्माण करणे हा आहे.


महत्वाच्या बातम्या :