Covid-19 New Cases: देशात कालच्या तुलनेत आज काही प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 38 हजार 18 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात देशात कोरोनामुळे 310 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात 1 लाख 57 हजार 421 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. सोमवारी देशात 2 लाख 58 हजार 89 रुग्णांची नोंद झाली होती. त्यामानाने आज 20 हजार 71 रुग्ण कमी झाले आहेत.


सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 17 लाख 36 हजार 628  झाली आहे. तर देशात आत्तापर्यंत 3 कोटी 53 लाख 94 हजार 882 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनामुळे आत्तापर्यंत देशात 4 लाख 86 हजार 761 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. सध्या देशात ओमायक्रॉनचे 8 हजार 891 एवढे आहेत. देशात लसीकरणाची मोहीम देखील वेगात सुरू आहे. आत्तापर्यंत देशात 158 कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात देशात 16 लाख 49 हजार 143 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 


दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 17 जानेवारी 2022 पर्यंत देशात 158 कोटी 4 लाख 41 हजार कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 79 लाख 91 हजार लसींचे डोस देण्यात आले. आत्तापर्यंत 70 कोटी 54 लाख कोरोना चाचण्या केल्या आहेत. सध्या देशातील पॉझिटीव्हीटी रेट हा 14 टक्क्यांच्या पुढे आहे. सक्रिय रुग्णांची बाबतीत भारत हा देशात सहाव्या क्रमांकावर आहे. कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यू हे अमेरीका, ब्राझीलमध्ये झाले असून, त्यानंतर भारतात झाले आहेत.


राज्यात काल कोरोनाच्या 31 हजार 111 नव्या रुग्णांची भर झाली असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 29, 092 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या आधी रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर असायची, त्यात आता घट होत असल्याचं दिसून येतंय. राज्यात काल 112 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1860 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 959 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: