मुंबई : छत्तीसगड मध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात आरक्षक आविनाश राय या पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या घरमालकाच्या दीड वर्षाच्या मुलीला सीगरेटचे चटके दिले आहे. आरक्षक रायने घर मालकाकडून लॉकडाऊनमध्ये काही पैसे उसने घेतले होते, ते पैसे घर मालकाने पुन्हा मागितले याचा राग मनात धरून हे किळसवाणे कृत्य आरक्षकने केलं
आरक्षक अविनाश राय हा छत्तीसगड येथील बालोद जिल्ह्यातील दुर्गा अक्षित केंद्र या ठिकाणी कार्यरत आहे. लॉकडाऊनमध्ये आरक्षकला पैशाची चणचण होती म्हणून आरक्षकने आपल्या घर मालकाकडून पैसे उसने घेतले. खूप दिवस झाले आरक्षककडून उसने घेतलेले पैसे परत न मिळाल्यामुळे घर मालकाने पैसे मागण्यास सुरवात केली.
स्वता:चे पैसे वारंवार मागावे लागत असल्यामुळे घर मालक ही निराश झाले पण त्यांना सुद्धा पैश्याची गरज होती म्हणून आरक्षककडून पैसे पुन्हा मागण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय उरला नव्हता. मात्र रागीट स्वभावाचा असलेला आरक्षकला याचा प्रचंड राग आला. घर मालकाने आपल्याला मदत केली हे सुद्धा तो विसरला. आरक्षक घर मालाकच्या घरी गेला. घरात घर मालकाची पत्नी आणि दीड वर्षाची लहान मुलगी होती. त्याने घर मालकाच्या मुलीला बळजबरीने दुसऱ्या खोलीत नेले आणि सीगरेटचे चटके देऊ लागला. चिमुकलीची आई खोली बाहेर रडत होती, ओरडत होती. मुलीला वाचवण्यासाठी विणवण्या करत होती मात्र आरक्षकला याची तीळमात्र सुद्धा दया आली नाही. त्या चिमुकलीच्या नाजूक शरीरावर 50 ठिकाणी आरक्षक ने सीगरेटचे चटके दिले.
मुलीची आई छत्तीसगडमध्ये लोकगायिका आहे. आपल्या मुली सोबत झालेल्या या घटनेबाबत पोलिसांमध्ये त्यांनी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास करत फरार आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.