शाळेतील एकाच मॅडमवर त्याच शाळेतील मास्तराचा आणि मुख्याध्यापकाचा जीव जडला. मुख्याध्यापक ती माझीच म्हणून हटून बसला होता. मात्र, शिक्षक सुद्धा ती माझीच म्हणून हटून बसला होता. त्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यपकाने 50 हजारांची सुपारी देत शिक्षकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पासवान यांच्यासह सात जणांना अटक केली आहे. रामाश्रय यादव हे महिला शिक्षिकेसोबत शाळेत जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. ही घटना बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील कुशेश्वरस्थान पोलीस स्टेशन परिसरात घडली. हत्या झालेल्या मास्तराचे नाव रामाश्रय यादव आहे.
शिक्षक हत्या प्रकरणात मोठा खुलासा
शिक्षक रामाश्रय यादव हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. कुशेश्वरस्थान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचरुकी पुलाजवळ ही अटक करण्यात आली. 28 जानेवारी रोजी रामाश्रय यादव नावाच्या शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ते बुलेटने प्राथमिक शाळा आदलपूर येथे जात होते. त्यांच्यासोबत महिला शिक्षिकाही होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पासवान यांचाही समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत. चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितले की, रामाश्रय यादव याचे शाळेतील एका शिक्षकेशी प्रेमसंबंध होते. याला मुख्याध्यापक रामचंद्र पासवान विरोध करत होते. किंबहुना खुद्द मुख्याध्यापकांनाही ती महिला शिक्षिका आवडली होती. त्यामुळे मुख्याध्यापकांनी रामाश्रय यादवला मार्गातून हटवण्याची योजना आखली. या हत्येचा ठेका हीरा यादव आणि इतर हल्लेखोरांसह मुख्याध्यापकांनी दिला होता. सहरसा आणि सुपौल येथील गुन्हेगारांना सुपारी देण्यात आली. मृतकासोबत विकास यादव नावाच्या व्यक्तीचा 2022 पासून वाद सुरू होता.
50 हजार रुपये सुपारी देण्यात आली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकाच्या हत्येसाठी रंजन यादव याला 50 हजार रुपयांची सुपारी देण्यात आली. हीरा यादव या शिक्षकाच्या येण्या-जाण्याची माहिती ठेवत होता. अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी तीन सहरसा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. एक सुपौल येथील तर तीन दरभंगा येथील आहेत. रंजन यादव उर्फ निरंजन यादव, सुबोध कुमार, प्रभाकर यादव, लालो यादव, हीरा यादव, रामचंद्र पासवान आणि शंभूकुमार चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक कुठे झाली?
झाडाघाट गोब्राही रंगेलीपूर येथून रंजन यादव, सुबोध कुमार आणि प्रभाकर यादव यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या घटनेत लालो यादव, हीरा यादव, रामचंद्र पासवान आणि शंभूकुमार चौधरी यांचाही सहभाग असल्याचे रंजन यादव यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले.
अशातच हे प्रकरण उघडकीस आले
मिळालेल्या माहितीनुसार, 28 जानेवारी रोजी रामाश्रय यादव हे बुलेट घेऊन शाळेत जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवले. रामाश्रय यादव यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शिक्षकांनी आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत सहरसा जिल्ह्यातून मुकेश यादव नावाच्या गुन्हेगाराला अटक केली. मुकेश यादवची चौकशी केल्यानंतर रंजन यादवला शिक्षकाच्या हत्येसाठी 50 हजार रुपयांचे सुपारी देण्यात आल्याचे पोलिसांना समजले. रामाश्रय यादव आणि विकास यादव यांच्यात 2022 पासून वाद सुरू असल्याचेही मुकेश यादव यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या