Omicron Variant: कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉननं जगभरात जाळ पसरलय. दिवसेंदिवस ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सर्वात धोकादायक मानल्या जाणार्‍या डेल्टा व्हेरिएंटची जागा ओमिक्रॉन व्हेरिएंट देखील घेत असल्याचं दिसून येतंय. ओमिक्रॉनमुळे अनेकांना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य असल्याचं मानलं जातंय. तरीही लोकांनी याबाबत गाफील राहू नये. ओमायक्रॉनवर मात केल्यानंतरही अनेकांना काही त्रास जाणवत असल्याची माहिती समोर आलीय. 


ज्या लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग होत आहे, त्यांना पाठ दुखीच्या समस्या जाणवत आहे. तसेच ओमायक्रॉनच्या नव्या प्रकारानं संक्रमित झालेल्या बाधितांमध्ये स्नायू दुखण्याची समस्या दिसून येत आहे. सध्या काही लोक पाठ आणि कंबर दुखण्याची तक्रार देखील करत आहेत, जी दिर्घकाळ टिकून राहते. ओमिक्रॉन व्हेरियंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसत आहेत. या प्रकारात लोकांना रात्री घाम येणे, घसा खवखवणे आणि कंबरदुखी यांसारख्या तक्रारी अधिक होत आहेत.


ओमायक्रॉनबाबत निष्काजीपणा टाळा
एखाद्याला वरील कोणताही लक्षणे जाणवत असल्यास त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि कोविड चाचणी करून घ्यावी. ओमायक्रॉनबाबत निष्काजीपणा करणं धोकादायक ठरु शकतं. यामुळं नागरिकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे.


ओमायक्रॉनपासून संरक्षण कसे करावे?
कोरोना व्हायरस किंवा ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी, स्वच्छतेची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासोबतच नेहमी मास्क लावावा आणि वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावे. याशिवाय, जर तुम्ही लस घेतली नसेल, तर लगेच लस घ्या. लसीकरणाने तुम्ही स्वतःला संसर्ग होण्यापासून वाचवू शकता.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha