नवी दिल्ली : पहिल्यांदा उत्तर प्रदेशमधील गोरखपूर, नंतर बिहारचं मुजफ्फरपुर आणि आता राजस्थानच्या कोटा शहरात हजारो बालकांचा अकाली मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता गुजरातमधील राजकोटमध्येही अनेक निष्पाप बालकं दगावल्याची धक्कादायक माहिती आली आहे. राजकोटमध्ये मागील वर्षभरात सरकारी रुग्णालयात 1235 बालकांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 या कालवधीतील ही आकेवारी आहे.


विशेष म्हणजे गेल्या डिसेंबर महिन्यात तब्बल 134 बालकांचा मृत्यू झाला आहे. यावर मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास टाळटाळ केली. आकडेवारीनुसार राजकोट येथील सरकारी रुग्णालयात मागील एक वर्षात 1235 बालकं दगावली आहेत.

जानेवारी 2019 - 122 बालकांचा मृत्यू
फेब्रुवारी 2019- 105 बालकांचा मृत्यू
मार्च 2019- 88 बालकांचा मृत्यू
एप्रिल 2019- 77 बालकांचा मृत्यू
मे 2019- 78 बालकांचा मृत्यू
जून 2019- 88 बालकांचा मृत्यू
जुलै 2019- 84 बालकांचा मृत्यू
ऑगस्ट 2019- 100 बालकांचा मृत्यू
सप्टेंबर 2019- 118 बालकांचा मृत्यू
ऑक्टोबर 2019- 131 बालकांचा मृत्यू
नोव्हेंबर 2019- 101 बालकांचा मृत्यू
डिसेंबर 2019- 134 बालकांचा मृत्यू

याव्यतिरिक्त अहमदाबाद सरकारी रुग्णालयात तीन महिन्यात 265 बालकांचा मृत्यू झालाय.
ऑक्टोबर 2019- 93 बालकांचा मृत्यू
नोव्हेंबर 2019- 87 बालकांचा मृत्यू
डिसेंबर 2019- 85 बालकांचा मृत्यू

राजस्थानच्या कोटा शहरात लोन रुग्णालयात काल तीन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर डिसेंबर ते आजपर्यंत मृत्यू झालेल्या बालकांची संख्या 110 वर पोहचली आहे. चालू जानेवारी महिन्यात म्हणजेच मागील चार दिवसांत 10 बालकं दगावली आहेत. माध्यमांमध्ये याची बातमी आल्यानंतर तिथल्या सरकारला आणि प्रशासनाला जाग आली. कोटाच नाही तर राजस्थानच्या अन्य जिल्ह्यातूनही बालकांच्या मृत्यूची माहिती समोर येत आहे. कोटनंतर काल बूंदीतूनही बालकं दगावल्याची माहिती समोर आली होती.
राजस्थानात बालकांच्या मृत्यूवरुन सोनिया गांधी गेहलोतांवर नाराज -
राजस्थानातील कोटा येथे डिसेंबर महिन्यात जेके लोन रुग्णालयामध्ये जवळपास 100 बालकं दगावली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही याप्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. राज्यातील प्रत्येक रुग्णालयात दररोज 3-4 मृत्यू होतात. त्यामुळे या गोष्टी काही नवीन नाहीत", असे विधान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केलं होतं. या विधानानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली होती.

संबंधित बातमी - 105 मुलं दगावलेल्या 'त्या' रुग्णालयाची पाहाणी करायला आलेल्या आरोग्यमंत्र्यासाठी गालिचे अंथरले 

2002 Gujarat Riots | 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट | ABP Majha