नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला भारतात आणण्यासाठी मोदी सरकारने नवीन आराखडा तयार केला आहे. दाऊदच्या पाकिस्तानमधील कारवायांवर नजर ठेवण्यासाठी गुप्तचर यंत्रणांच्या सोबत रॉ, ईडी, आयकर विभाग आणि सीबीआय मिळून 50 अधिकाऱ्यांचं पथक तयार करण्यात आलं आहे.


 

‘माझा’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घडामोडींनंतर दाऊद गेले काही महिने कराचीच्या बाहेर हालचाल करत नाही. आपला माग कोणाला लागू नये, याकरता दाऊद कोणाचेही फोन उचलत नसल्याची माहितीही आता समोर येते आहे.

 

याचसोबत दाऊद आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी खास दुबईहून 6 बुलेटप्रूफ गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारताने तयार केलेल्या ब्लू प्रिंटला दाऊद घाबरला असल्याची चर्चा आंतराष्ट्रीय स्तरावर सुरु आहे.