भोपाळ : कॉंग्रेस माझा सामना करु शकत नाही म्हणून ते माझ्या आईला शिव्या देतात, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशतील छतपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.
काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांनी पंतप्रधान मोदींच्या आईची तुलना डॉलरच्या तुलनेत रुपयाशी केली होती. ते म्हणाले होते की, "2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी मोदी म्हणायचे, डॉलर समोर रुपया इतका घसरत आहे की त्याचं मूल्य त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या वयाच्या जवळ पोहोचत आहे. आता आम्ही म्हणतो, आज रुपया इतका घसरत आहे की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईच्या वया जवळ पोहोचला आहे." याच वक्तव्याचा मोदींनी आज समाचार घेतला.
मध्यप्रदेश निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरु आहे. या प्रचारात कॉंग्रेस, भाजप एकमेकांवर शाब्दिक बाण सोडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, गल्लीत जेव्हा भांडणं होतात, तेव्हा ज्याच्या बाजूने सत्य नसतं तर तो मुद्द्याला सोडून समोरील व्यक्तिच्या आईला शिव्या द्यायला सुरु करतो. कॉंग्रेसही तशाचप्रकारे करत आहे.
जेव्हा मुद्दा नसतो, कुसंस्कार भरलेले असतात, अहंकार बळावलेला असतो, तेव्हा जाऊन कोणाच्या आईला शिव्या देण्याची हिम्मत होते. स्वातंत्र्यानंतर ज्यांनी इतकी वर्ष सत्ता उपभोगली, त्या पक्षाचे जबाबदार लोक मोदीला भिडायचं सोडून, मोदीच्या आईला शिव्या देत आहेत. अशा शब्दात नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसवर टीका केली.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, "ज्या आईला राजकारणाचा र माहित नाही, जी आई आपल्या पूजापाठमध्ये व्यस्त आहे, त्या आईला राजकारणात घेऊन आले. म्हणून कॉंग्रेसच्या लोकांमध्ये मोदीचा सामना करण्याची ताकद नाही. "
....म्हणून माझ्या आईला शिव्या देतात : नरेंद्र मोदी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Nov 2018 03:30 PM (IST)
"ज्या आईला राजकारणाचा र माहित नाही, जी आई आपल्या पूजापाठमध्ये व्यस्त आहे, त्या आईला राजकारणात घेऊन आले. म्हणून कॉंग्रेसच्या लोकांमध्ये मोदीचा सामना करण्याची ताकद नाही. "
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -