Continues below advertisement

Thalapathy Vijay Karur rally: तमिळनाडूतील करूर येथे अभिनेता थलपती विजयच्या (Thalapathy Vijay Karur rally) करूर  रॅलीत चेंगराचेंगरी होऊन तब्बल 40 जणांचा जीव गेला. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दिलेल्या माहितीनुसार या भीषण चेंगराचेंगरीत (Karur stampede accident) 16 महिला आणि 10 मुलांसह 40 जणांचा मृत्यू झाला. 51 जण आयसीयूमध्ये आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. विजय यांच्या रॅलीसाठी 10 हजार लोकांची परवानगी देण्यात आली होती. तथापि, 1,20,000 चौरस फूट परिसरात 50,000 हून अधिक लोक जमले होते. अभिनेता विजय तब्बल सहा तास उशिराने पोहोचला. विजयला व्यासपीठावर 9 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याचे कळवण्यात आले. स्टेजवरून तिला शोधण्याचे आवाहन केले, ज्यामुळे चेंगराचेंगरी सुरुवात झाली.

विजय जखमींना भेटलाच नाही (Vijay political rallies Tamil Nadu) 

 

Continues below advertisement

दरम्यान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी (Tamil Nadu government’s immediate response) आदल्या रात्री उच्चस्तरीय बैठक घेतली आणि रात्री उशिरा करूर येथे पोहोचले. स्टॅलिन यांनी मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात भेट दिली. दरम्यान, गृहमंत्रालयाने घटनेबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. घटनेनंतर विजय जखमींना भेटला नाही. तो थेट चार्टर्ड विमानाने चेन्नईला गेला. अपघातानंतर अभिनेता विजय करूरहून थेट त्रिची विमानतळावर गेला आणि तेथून तो चेन्नईला रवाना झाला. तो जखमींना भेटला नाही किंवा सार्वजनिक सांत्वनही दिले नाही. तथापि, त्याने X वर लिहिले, "माझे हृदय तुटले आहे. मला खूप वेदना आणि दुःख होत आहे. करूरमध्ये जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जखमींसाठी प्रार्थना करतो."

 

40 जणांच्या मृत्यूची 6 कारणे (Vijay rally stampede reasons) 

  • अभिनेता विजय करूरमध्ये नियोजित वेळेपेक्षा जवळजवळ सहा तास उशिरा पोहोचला, ज्यामुळे त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली.
  • सायंकाळी 7:45 च्या सुमारास, काही लोक विजयच्या बसकडे जाऊ लागले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
  • धक्का आणि धक्काबुक्कीमुळे अनेक लोक बेशुद्ध पडले. उष्णता आणि गर्दीमुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
  • चेंगरीत, अनेक मुले त्यांच्या कुटुंबांपासून वेगळी झाली आणि अनेकांना गर्दीत चिरडले गेले, लोकांनी तुडवले.
  • विजयच्या स्टेजजवळ वाढत्या गर्दीला व्यवस्थापित करण्यासाठी पोलिस किंवा स्वयंसेवक उपस्थित नव्हते. परिणामी, गर्दी अनियंत्रित झाली.
  • प्रशासनाला 30 हजार लोक येण्याची अपेक्षा होती, परंतु 50 हजारहून अधिक लोक आले. दुप्पट संख्येला हाताळण्यासाठी व्यवस्था नव्हती.

 चौकशी आयोग स्थापन केला (Judicial inquiry commission Tamil Nadu) 

दरम्यान, मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी अपघाताची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती अरुणा जगदीसन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. जखमींना 1 लाख रुपये मिळतील. मुख्यमंत्री स्टॅलिन रात्री उशिरा करूर येथे पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. 

सकाळी नमक्कल रॅलीतून कोणताही धडा शिकला नाही (Major reasons behind the Karur rally accident) 

विजयने शनिवारी दोन रॅली काढल्या. सकाळी 8:45 वाजता नमक्कल येथे सभेला परवानगी देण्यात आली होती, परंतु तो दुपारी 2:45 वाजता पोहोचला. तोपर्यंत, थकलेले आणि भुकेलेले लोक उन्हात कोसळू लागले होते. गर्दी नियंत्रणाबाहेर गेली, अनेक लोक जखमी झाले आणि एका महिलेचा पाय मोडला. गर्दी नियंत्रित करण्यात आयोजकांना अपयश आले. त्यानंतर विजय दुपारी 3.45 वाजता नमक्कलहून निघाला.

द्रमुकच्या विरोधात स्वतःला उभे करत आहे (Vijay vs DMK politics) 

विजयने 2 फेब्रुवारी 2024 रोजी द्रमुकची स्थापना केली आणि 2026 च्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा आपला इरादा जाहीर केला. परिणामी, तो राज्यभर रॅली काढत आहे. पक्षाचा अजेंडा, विचारसरणी आणि सुधारणा योजना जनतेसमोर स्पष्ट करणे हा त्याचा उद्देश आहे. तो स्वतःला सत्ताधारी द्रमुकचा सर्वात मोठा विरोधक म्हणून सादर करू इच्छितो.

इतर महत्वाच्या बातम्या