Tamil Nadu Stampede TVK Vijay Rally: अभिनेता विजय थलपतीच्या (TVK Vijay) करुर (Karur Rally Marathi News) इथल्या राजकीय रॅलीत मोठी चेंगराचेंगरी (Tamil Nadu Stampede) झाली. काल (27 सप्टेंबर) झालेल्या या घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला असून 70 जखमी झाले आहेत. तर काहीजण बेपत्ता झाल्याचीही माहिती आहे. मृतांमध्ये 10 महिलांचा समावेश आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.

Continues below advertisement

Tamil Nadu Stampede TVK Vijay Rally: १०,००० लोकांची गर्दी अपेक्षित होती पण...

मिळालेल्या माहितीनुसार काल (शनिवारी) तमिळनाडूतील करूर येथे अभिनेता-राजकीय नेता विजय रुपानी यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३९ जणांचा मृत्यू झाला आणि ९५ जण जखमी झाले. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की रॅली आयोजकांना सुमारे १०,००० लोकांची गर्दी अपेक्षित होती. मात्र, लोक येऊ लागले तसे, हा प्रवाह थांबणे अशक्य वाटले. करूर येथील रॅली मैदानावर सुमारे २७,००० लोक जमले होते.

Tamil Nadu Stampede TVK Vijay Rally: घटनास्थळी ५०० पोलिस अधिकारी तैनात 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत रॅलीचे नियोजन करण्यात आले होते, जरी लोक सकाळी ११ वाजल्यापासूनच येऊ लागले. सकाळपासूनच विजयाच्या येण्याची वाट पाहत असताना अनेक लोक भूक आणि तहानने त्रस्त होते. सुरक्षा व्यवस्थेबाबत एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळी ५०० पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले होते. विजय यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुकही केले. त्याचबरोबर विजय म्हणाले की, या गैरव्यवस्थेची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. गर्दीइतके पोलिस तैनात करणे अशक्य आहे. चेंगराचेंगरीचे खरे कारण चौकशीनंतरच कळेल असे तामिळनाडूच्या डीजीपींनी म्हटले आहे." त्यांनी सांगितले की, चौकशीसाठी एक सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे.

Continues below advertisement

Tamil Nadu Stampede TVK Vijay Rally: रॅलीत काय घडले?

विजयने २०२४ मध्ये तमिलगा वेत्री कळघम नावाची पार्टी सुरू केली. तो तीन दशकांपासून तमिळ चित्रपटसृष्टीत स्टार आहे. विजयने काल संध्याकाळी ७:३० च्या सुमारास भाषण सुरू केले होते तेव्हा चेंगराचेंगरी झाली. लोक सकाळपासून त्याची वाट पाहत होते. प्रचंड आवाज आणि तीव्र उष्णतेमुळे लोक बेशुद्ध पडले. अनेक मुले आणि महिला बेशुद्ध पडल्या. त्यानंतर विजयने आपले भाषण थांबवले आणि गर्दीला पाण्याच्या बाटल्या वाटण्यास सुरुवात केली. त्यांनी पोलिसांना परिस्थिती हाताळण्याचे आवाहनही केले.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सांगितले की, आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात १३ पुरुष, १७ महिला आणि चार मुले आहेत. चेंगराचेंगरीत पाच मुलींचाही मृत्यू झाला आहे. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

Vijay Thalapathy expressed his condolences: विजय थलापतीने व्यक्त केला शोक

करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून अभिनेता विजय थलापतीने शोक व्यक्त केलाय. आपल्याला असह्य, अवर्णनीय वेदना आणि दुःख आहे, असं विजय म्हणाला. जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत आपल्या संवेदना आहेत. रूग्णालयात उपचार घेत असलेले लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनादेखील विजयने केली आहे.