पुलवामा : भारतीय सैन्यावर दहशतवाद्यांनी पुन्हा मोठा हल्ला केला आहे.  जम्मू-काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरात सीआरपीएफच्या गाडीला अतिरेक्यांच्या विस्फोटकांनी भरलेल्या गाडीनं धडक दिली यात 39 भारतीय जवान शहीद झाले आहेत. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.



गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला टार्गेट केले.  लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी मार्गावर स्फोट घडवला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधूंद गोळीबार केला. यात 40 जवान शहीद झाले आहेत. तर 20 पेक्षा अधिक जवान जखमी झाले आहेत.

आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे.
जम्मू काश्मीरमधील पुलवामाच्या अवंतीपुरा भागात लष्करी जवानांवर हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे.  या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचं ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे. दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेला हा भ्याड हल्ला आहे. मी याचा निषेध करतो, जवानांचे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही सर्व भारतीय एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शूर शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत उभे आहोत. जखमी झालेले जवान लवकर पूर्णपणे बरे होवोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत.