दहशतवाद्यांचा गोळीबार, तीन जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम | 17 Dec 2016 08:28 PM (IST)
श्रीनगर: जम्मू काश्मीरच्या पम्पोरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 3 जवान शहीद झाले आहेत. जम्मू-श्रीनगर हायवेवरच्या भारतीय लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र हल्ल्याच्या वेळी हायवेवर सर्वसामान्य नागरिक असल्यामुळं भरातीय जवानांना थेट गोळीबार करता आला नाही. हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले असून, भारतीय लष्करानं पम्पोरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलंय.