Attack On Red Fort: दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दहशतवादी संघटना आयएसआय (ISI) यांच्या एका मोठ्या कटाचा खुलासा केला आहे. दिल्ली पोलिसांनी जानेवारी 2023 मध्ये दिल्लीतील जहांगीरपुरी भागातून दोन दहशतवाद्यांना (Terrorist) अटक केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नौशद आणि जगजीत या दहशतवाद्यांना दिल्लीतील लाल किल्ल्यावर (Red Fort) असलेल्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यास सांगितले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने 10 मे रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या दहशतवादी संघटनांचा हा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. त्यामुळे देशात होणाऱ्या एका मोठ्या हल्ल्यापासून बचाव झाला असल्याचं देखील म्हटलं जात आहे. 


यासोबतच त्यांना पंजाबमधील बजरंग दलाचे नेते आणि हरिद्वारमधील साधूंवर देखील हल्ला करण्याचा कट रचला होता. माहितीनुसार, पंजाबमधील बंजरंग दलाच्या नेत्यांच्या हत्येसाठी या दहशतवाद्यांना दोन लाख रुपये देखील देण्यात आले होते. 


एका हिंदू तरुणाची झाली होती हत्या 


तपासातून असे देखील समोर आले की, नौशद आणि जगजीत या दहशतवाद्यांनी आपल्या मोहरक्याचा विश्वास मिळवण्यासाठी एका तरुणाची हत्या देखील केली होती. दोघांनी दिल्लीतील एका तरुणाचे अपहरण केले आणि नंतर त्याची हत्या केली. त्याच्या हत्येचा व्हिडिओ त्या दोघांनी त्यांच्या मोहरक्यांना पाठवला. त्यानंतर त्या मोहरक्याचा विश्वास त्या दोघांवर बसला. 


पाकिस्तानात होता संपर्क


अटक केलेल्या दहशतवाद्यांनी मान्य केले की, ते पाकिस्तानीतील त्यांना सांभाळणाऱ्या चार लोकांच्या संपर्कात होते. दोघांनी पोलिसांना सांगितले की ते पाकिस्तानातील नजीर भट, नासिर खान, नजीर खान आणि हिजबुल मुजाहिद्दिन या लोकांच्या संपर्कात होते. या सगळ्यांना आयइएसच्या आदेशांवर काम करण्यास सांगितले जात होते. 


अमृतसरमधील सुवर्ण मंदिर परिसरात स्फोट


 पंजाबमधील अमृतसर  येथील सुवर्ण मंदिर परिसरात एकापाठोपाठ एक स्फोट होत आहेत. पहिल्या दोन स्फोटांनंतर गुरुवारी सुवर्ण मंदिरात तिसरा स्फोट झाला. हा स्फोट आधीच्या बॉम्बस्फोटांपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळाचा परिसर चारही बाजूंनी सील केला आहे.अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळ 5 दिवसांत स्फोटाची ही तिसरी घटना आहे. सर्वात आधी, 6 मे रोजी सुवर्ण मंदिराकडे जाणाऱ्या हेरिटेज स्ट्रीटवर स्फोट घडवण्यात आला. त्यानंतर 8 मे रोजी त्याच ठिकाणी दुसरा स्फोट झाला, ज्यामध्ये एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली होती. आता कालच्या स्फोटानंतर एकापाठोपाठ होणाऱ्या स्फोटांमुळे चिंता वाढली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Golden Temple: अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात पुन्हा स्फोट; तिसऱ्या स्फोटानं खळबळ, पोलिसांकडून कसून तपास