पूँछमध्ये दहशतवादी आणि लष्करात चकमक सुरू
एबीपी माझा वेब टीम | 29 Sep 2016 07:07 PM (IST)
जम्मू-काश्मीर: पाकव्याप्त काश्मीरात घुसून भारतीय लष्करानं 38 ते 40 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या कारवाईनंतर पूँछ परिसरात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात जम्मू पोलीस दलातला एक जवान जखमी झाला आहे. मात्र भारतीय लष्कराच्या जवानांनी या 2 ते 3 दहशतवाद्यांना घेराव घातला असलल्याचं समजतं आहे. भारतानं सर्जिकल स्ट्राईकनं दहशतवाद्यांना तब्बल 38 ते 40 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यानंतर भारतानं पाकिस्तानचा खोडसाळपणा लक्षात घेऊन भारताच्या 750 किलोमीटरच्या सीमेवर हायअलर्ट जारी केला आला आहे. तसंच सीमेनजीकच्या 10 किलोमीटरमधील सगळी गावं रिकामी करण्यात आली आहेत. दरम्यान पाकविरोधी कारवाईत काँग्रेससह सगळ्याच विरोधी पक्षांनी आपण सरकारसोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे.