श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यात एक जवान शहीद तर दोन जवान जखमी झाले आहेत. श्रीनगरमधील पंथा पोलीस स्टेशनजवळ हा हल्ला झाला आहे.


या हल्ल्यानंतर श्रीनगरच्या डीपीएस शाळेच्या परिसरात संशयित दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. काही नागरिकांनी दहशतवाद्यांना या परिसरात पाहिल्याचं सांगितलं. शाळेच्या परिसरातून फायरिंगचा आवाजही ऐकला गेला. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाने स्विकारली आहे.

पंथा चौकात सीआरपीएफ जवानांवर हल्ला करुन डीपीएस शाळेच्या दिशेनं हे दहशतवादी पळाले. या संपूर्ण परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, तर दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे.