जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2016 11:32 PM (IST)
जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आहे. राष्ट्रीय रायफलच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरु केल्याची माहिती आहे. भारतीय जवानांकडूनही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दोन्ही बाजूकडून जोरदार गोळीबार झाला असून 3 ते 4 दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं प्राथमिक वृत्त आहे. UPDATE : दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश : सूत्र UPDATE : बीएसएफचे दोन जवान जखमी : सूत्र पाकव्याप्त काश्मीरात भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा दहशतवादी हल्ला झाला आहे. सर्जिकल स्ट्राईकपूर्वीच दहशतवाद्यांचा जथ्था भारतात घुसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. उरी हल्ल्यात सहभागी झालेल्या घुसखोरांचा हा दुसरा चमू असण्याची शक्यता आहे.