Terrorist Activity : पाकिस्तानी विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यासह त्याचे वडील आणि तीन जणांवर आरोपपत्र दाखल झाला आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणे आणि लष्कराची माहिती सीमेबाहेर पोहोचवल्याचे या सर्वांवर आरोप लावण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास एजन्सी (SIA) ने ही कारवाई केली आहे.
"पाकिस्तान तरुणांना दहशतवादी गटांमध्ये भरती करण्यासाठी उच्च शिक्षणाचा गैरवापर करत असल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. शिक्षणासाठी पाकिस्तानात गेलेले आणि नियंत्रण रेषेजवळ काश्मीरमध्ये घुसखोरी करताना अशा 17 तरुण सुरक्षा दलांच्या चकमकीत मारले गेले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आसिफ शब्बीर नाईक, त्याचे वडील शब्बीर हुसेन नाईक आणि सफदर हुसेन ( सर्व रा. डोडा, काश्तीगड) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यातील शब्बीर आणि सफदर सध्या पाकिस्तानात असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसआयएने भारतीय न्यायालयाद्वारे पाकिस्तानी न्यायालयाशी संपर्क साधून आरोपींबाबत माहिदी देण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीची मागणी केली आहे. एसआयएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. परंतु, एसआयएने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करेल.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आसिफ शब्बीर नाईकला इस्लामाबादमधील आंतरराष्ट्रीय इस्लामिक विद्यापीठाचा जनसंवाद विभागाचा विद्यार्थी म्हणून दाखवण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात तो बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या हिजबुल मुजाहिदीनच्या मीडिया शाखेत काम करत होता. त्याला श्रीनगर विमानतळावर गुप्तचर माहितीच्या आधारे पकडण्यात आले. तो अभ्यासासाठी नाही तर दहशतवाद्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भेट देण्यासाठी पाकिस्तानला जात असल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या