चंदीगढ : जम्मू-काश्मीरच्या पुलवामातल्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. “दहशतवादावर हल्ला करुन नाही तर संवादातून मार्ग निघेल” असं धक्कादायक विधान काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी केलं आहे. या विधानानंतर देशभरात नवज्योत सिंह सिद्धूंच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.


सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्लात 39 जवान शहीद झाले आहेत. तर 20 जवान गंभीर जखमी आहेत. गेल्या दोन दशकातला भारतीय सैन्यावरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानला आणि जैश-ए-मोहम्मदला आता कोणत्याही चर्चेविना धडा शिकवा. अश्या भावना देशातले लोक व्यक्त करत असताना सिद्धू यांनी संवादाचा मार्ग अवलंबण्याची भाषा केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

VIDEO | दहशतवादावर हल्ला करुन नाही तर संवादातून मार्ग निघेल : नवज्योत सिंह सिद्धू



फक्त संवादातूनच पाकिस्तानसोबत असलेले संबंध सुधारतील असं सिद्धू यांनी म्हटलं आहे. तर  ‘या हल्ल्याचा निषेध करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 4000 जवान जात असताना त्याना कोणतीही सुरक्षा नाही? असू होऊचं कसं शकतं असा सवाल सिद्धू यांनी उपस्थित केला आहे. तसेच गुप्तचर यंत्रणांवरसुद्दा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

दहशतवाद्यांच्या मुद्द्यावर चर्चेतूनच कायमचा तोडगा निघू शकतो. आपल्या जवानांनी कधीपर्यंत बलिदान द्यायचं? आता या गोष्टींच्या मूळापर्यंत जाऊन त्यावर कायमचा उपाय काढला पाहिजे. एकमेकांवर आरोप करुन काही फायदा होणार नाही, असे सिद्धू म्हणाले.