आधी 500 हून अधिक दहशतवादी, आता फक्त 200 !
गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनुसार, सर्जिकल स्ट्राईकआधी पाकव्याप्त काश्मीरमधील ट्रेनिंग कॅम्पमध्ये 500 हून अधिक दहशतवादी होते. मात्र, आता तिथे जवळपास 200 च दहशतवादी आहेत. भारतीय लष्कराच्या सर्जिकल ऑपरेशननंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रचंड भीतीच्या वातावरणात आहेत.
भारताच्या भीतीने कॅम्प रिकामे!
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने याआधीच 18 दहशतवादी ट्रेनिंग कँपना लष्कराच्या ठिकाणांवर स्थलांतरित केलं होतं. मात्र, उरलेले 24 ट्रेनिंग कॅम्प आता दहशतवाद्यांनी भारताच्या भीतीनेच रिकामे केले आहेत.
लष्कर-ए-तोयबाचे कॅम्पही रिकामे!
भारतीय लष्कराच्या भीतीने जे कॅम्प रिकामे केले गेले, त्यांमध्ये मुजफ्फराबादजवळील लष्कर-ए-तोयबाचा मानशेरा कॅम्पही आहे, जिथे 26/11 च्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं गेलं होतं.
300 हून अधिक दहशतवाद्यांचा पळ
गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी भीती आहे की पुढील सर्जिकल स्ट्राईक त्यांच्या कॅम्पवर होऊ नये आणि आपलाही खात्मा होऊ नये. म्हणूनच 300 हून अधिक दहशतवाद्यांनी पळ काढला आहे.
काही घरी पळून गेले, काहींना सुरक्षित स्थळी हलवलं!
पाकव्याप्त काश्मीरमधील कॅम्पमधून पळ काढलेले दहशतवादी आपापल्या घरात पळून गेलेत, तर काहींना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने सुरक्षित स्थळी हलवले आहे. जैश, लष्कर आणि हिजबुलचे 200 हून अधिक दहशतवादी ट्रेनिंगनंतर घुसखोरीसाठी तयार होते.
भारताचा सर्जिकल स्ट्राईक
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी 27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली.
संबंधित बातम्या
सार्क परिषद पुढे ढकलली, पाकला एकटं पाडण्यात भारताला यश!