लाहोर : श्रीनगरच्या पांथा चौकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं लाहोर कनेक्शन समोर आलं आहे. दहशतवाद्यांसाठी लाहोरमध्ये जमात उद दावाच्या मुख्यालयात हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान प्रार्थन करत असलेला एक व्हिडीओ समोर आला आहे.


दहशतवाद्यांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन
दहशतवादी संघटना जमात उद दावाच्या लाहोरमधील मुख्यालयातील हा व्हिडीओ आहे. मुख्यालयात बसलेला एक व्यक्ती श्रीनगरमधील डीपीएल शाळेत सुरु असलेल्या दहशतवादी हल्ल्याची लाईव्ह कॉमेंट्री करत आहे. शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा व्यक्त हल्लेखोरांना लष्कराचा मुडाहिद्दीन असल्याचं सांगत, ते भारतीय सैन्याला सडेतोड उत्तर देस असल्याचं सांगत आहे. या व्यक्तीसोबत जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा हाफिज अब्दुल रहमान मक्कीही बसलेला दिसत आहे.

इतकंच नाही हा व्यक्ती दहशतवाद्यांसाठी ईदच्या नमाजादरम्यान श्रीनगरमध्ये हल्लेखोर दहशतवाद्यांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन करत आहे.

सध्या जमात उद दावाचं नेतृत्त्व हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की करत आहेत. पाकिस्तानात बसलेले दहशतवादीच काश्मीरसह भारतात दहशत पसरवत असल्याचा पुरावा म्हणजे हा व्हिडीओ आहे.

पंथा चौकचे दोन्ही हल्लेखोर दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगरच्या पांथा चौकात शनिवारी CRPF च्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये सीआरपीएफचे सब इन्स्पेक्टर साहिब शुक्ला शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाच्या प्रत्युतरानंतर दहशतवादी जवळच्या डीपीएस स्कूलमध्ये घुसले. यानंतर जवानांनी शाळेला वेढा दिला होता. यानंतर दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पाहा व्हिडीओ