जम्मू-काश्मीर: सतत धुमसणारं जम्मू-काश्मीरचं खोरं फुटीरतवाद्यांच्या उपद्रवानं ईदच्या दिवशीही धुमसतं आहे. फुटीरतावाद्यांनी पुन्हा सैन्यावर दगडफेक केली आहे.
श्रीनगरमधल्या ईदगाह, पुलवामा आणि अनंतनागमध्ये सैन्यावर दगडफेक सुरु आहे. काश्मीरचे तरुण पाकिस्तानचे झेंडे हातात घेऊन सैन्यावर दगडफेक करत आहे. गर्दीला पांगवण्यासाठी सैन्याकडून अश्रुधूरही सोडण्यात येत आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्यास उशीर लागतो आहे.
ईदचं नमाज संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात फुटीरतावादी रस्त्यावर उतरले. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानी झेंडे फडकवून लष्कराच्या जवानांवर दगडफेक केली. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचं समजतं आहे.
ईदच्या मूहुर्तावर कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी लष्करानंही संयम पाळत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. पण मागील एक महिन्यापासून अशाप्रकारचे हल्ले लष्करावर वारंवार केले जात आहेत.