श्रीनगर : काश्मीरच्या उरी हल्ल्ल्यात हल्ल्यातल्या शहीदांची संख्या आता 17 वर पोहोचली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये भारतीय सैन्यदलाच्या हेडक्वार्टरवर हा हल्ला करण्यात आला होता.


चार दहशतवाद्यांनी लष्करी मुख्यालयावर हल्ला केला होता. चारही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याची माहिती असून त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र यात 17 जवान गमवावे लागले.

काल पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हल्ल्याला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळ मुख्यालय परिसरात गोळीबार आणि स्फोटाचे आवाज सुरुच होते. लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. उरीमधील बाराव्या ब्रिगेडचं मुख्यालय एलओसीपासून नजीक आहे. हीच संधी साधून आत्मघाती हल्लेखोरांनी मुख्यालय वेठीस धरलं.

दरम्यान, काश्मीरच्या उरीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी केला असून. ठार झालेले चारही अतिरेकी पाकिस्तानचे असल्याचं समोर आलं आहे.

धक्कादायक गोष्ट ही की कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांकडून मिळालेल्या साऱ्या वस्तू या पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आल्याचंही स्पष्ट झालं आहे.

या हल्ल्यासाठी एकूण 16 अतिरेक्यांची टोळी भारतात घुसल्याचं लष्करानं मान्य केलं. त्यामुळे अजूनही 12 अतिरेकी हे काश्मीरमध्ये मोकाट असू शकतात अशी माहितीही लष्करानं दिली आहे.

 

-------------------------

उरीमधील हल्ला अत्यंत भ्याड, दहशतवाद्यांची गय केली जाणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उरी हल्ल्याचा तीव्र निषेध

https://twitter.com/narendramodi/status/777417302912430080

https://twitter.com/narendramodi/status/777417419203706880

https://twitter.com/narendramodi/status/777417540976926725

गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरु, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, आयबी प्रमुख दिनेश्वर शर्मा, रॉ संघटनेचे प्रमुख, केंद्रीय सुरक्षा सचिव, केंद्रीय गृहसचिव, सीआरपीएफ महासंचालकांची उपस्थिती



LIVE UPDATE : संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांना तात्काळ श्रीनगरला रवाना होण्याचे पंतप्रधानांचे आदेश

चार दहशतवाद्यांनी लष्करी मुख्यालयावर हल्ला केला होता. चारही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याची माहिती असून त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र 17 जवान गमवावे लागले.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी दुपारी बैठक घेण्यात येणार असून संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरही दुपारी दोनच्या सुमारास दिल्लीत पोहचतील. त्यानंतर तेही लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. यामध्ये कसं प्रत्युत्तर द्यावं याबाबत मंथन करण्यात येईल.

LIVE UPDATE : चार दहशतवाद्यांचा खात्मा, कोंबिंग ऑपरेशन सुरु

BREAKING : उरीमध्ये दहशतवाद्यांचा धुमाकूळ, लष्करी मुख्यालयावरील हल्ल्यात 17 जवान शहीद

LIVE UPDATE : गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून रशिया आणि अमेरिका दौरा रद्द

LIVE UPDATE : आत्मघाती हल्ल्यात लष्कराचे दोन जवान शहीद


LIVE UPDATE : हल्ल्यात 16 जवान जखमी झाले असून त्यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर



पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हल्ल्याला सुरुवात झाल्याची माहिती आहे. त्यानंतर काही वेळ मुख्यालय परिसरात गोळीबार आणि स्फोटाचे आवाज सुरुच होते. लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. उरीमधील बाराव्या ब्रिगेडचं मुख्यालय एलओसीपासून नजीक आहे. हीच संधी साधून आत्मघाती हल्लेखोरांनी मुख्यालय वेठीस धरलं.