नवी दिल्ली : पासपोर्ट मिळवण्यासाठी तन्वी सेठ यांनी चुकीची माहिती दिली होती, अशी माहिती पोलीस रिपोर्टमधून समोर आली आहे. नोएडाला राहणाऱ्या तन्वी सेठने आपण लखनौला राहत असल्याची खोटी माहिती पासपोर्ट अधिकाऱ्यांना दिली होती.
“मी पती अनस सिद्दीकीसोबत नोएडात नोकरी करत आहे, पण माझं काम असं आहे की ते लखनौतूनही करता येते.त्यामुळे मी लखनऊलाच राहते,” अशी माहिती तन्वी सेठने पासपोर्ट ऑफिसला दिली होती. पण तन्वी सेठ ही केवळ गेल्या सहा दिवसांपासूनच लखनौमध्ये राहत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
त्यामुळे सुरुवातीला पासपोर्ट नाकारण्याचं कारण हिंदू-मुस्लीम वाद हे नव्हतं तर तन्वी यांनी दिलेल्या खोट्या माहितीमुळे पासपोर्ट नाकारला गेला होता.
पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता
एखाद्या पत्त्यावर सहा महिने राहत असल्यावरच त्या पत्त्याचा पासपोर्ट मिळू शकतो, असा नियम आहे. पण नोएडात राहणाऱ्या तन्वी सेठ यांनी पासपोर्टसाठी लखनौतून अर्ज केला. त्यासाठी खोटी माहितीही सादर केली. त्यामुळेच नियम डावलणाऱ्या तन्वी सेठ यांचा पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाकडून रद्द केला जाऊ शकतो. तसंच खोटी माहिती दिल्याबद्दल तन्वी सेठ यांच्याविरोधात गुन्हाही दाखल होऊ शकते.
दरम्यान, पासपोर्ट नाकारणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करत तन्वी सेठला पासपोर्ट दिल्यामुळे सोशल मीडियावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर सुषमा स्वराज यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित ट्रोलर्सने केलेले ट्वीट्सही शेअर केले होते.
‘तन्वी सेठ पोलिसांशी खोटं बोलल्या’ ; पासपोर्ट प्रकरणाला नवं वळण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jun 2018 09:56 PM (IST)
एखाद्या पत्त्यावर सहा महिने राहत असल्यावरच त्या पत्त्याचा पासपोर्ट मिळू शकतो, असा नियम आहे. पण नोएडात राहणाऱ्या तन्वी सेठ यांनी पासपोर्टसाठी लखनौतून अर्ज केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -