मुंबई: चलनात नवीन आलेल्या पाचशे आणि दोन हजारच्या नोटांची लांबी, रुंदी आकारात वेगळी असल्यानं देशभरात अडीच लाखपेक्षा जास्त एटीएम यंत्रांचं सेटिंग बदलावं लागणार आहे. यासाठी दीड हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे.


एटीएम मशिनच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये बदल करावा लागणार आहे. सध्या एटीएममध्ये दोन कॅसेट्स वापरल्या जातात. त्यामध्ये आणखी दोन कॅसेट्स बसवाव्या लागणार आहेत.

सध्याची दोन हजाराची नोट पातळ असल्यानं त्या नोटा एटीएम यंत्रात जास्त बसतील. त्यामुळे पूर्वीपेक्षा दुप्पट पैसे मिळतील. मात्र, नव्या नोटांमुळे एटीएममधल्या बदलामुळे दीड हजार कोटींची झळ सरकारला बसणार आहे.