जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस. पंतप्रधानपदावरुन डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांबद्दल जगभरात कौतुक केले जाते. मात्र, तरीही अनेक निर्णयांबाबत त्यांच्यावर वेळोवेळी टीकाही झाली. "हजारो जबावों से अच्छी है मेरी खामोशी, ना जाने कितने सवालों की आबरू रखी", असे म्हणत त्यांनी अनेकदा आपल्या कामातून बोलणं पसंत केलं. अत्यंत विनम्र व्यक्तिमत्त्व म्हणून जगभरात परिचित असणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 10 रंजक गोष्टी...
1. डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात 'गाह' या गावी झाला. हे गाव भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानातील पंजाब प्रांतात समाविष्ट झालं. डॉ. मनमोहन सिंग 2004 साली भारताचे पंतप्रधान झाले, त्यावेळी पाकिस्तानातील पंजाब प्रांताने गाह गावाचा विकास करुन मनमोहन सिंग यांचा एकप्रकारे सन्मान करण्याचं ठरवलं. तेथील शाळेचे नावही बदलून 'डॉ. मनमोहन सिंग गव्हर्नमेंट बॉईज प्रायमरी स्कूल' असे करण्यात आले.
2. डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे पहिले सिख धर्मीय पंतप्रधान होते.
3. डॉ. मनमोहन सिंग हे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर दुसरे असे पंतप्रधान आहेत, ज्यांनी पंतप्रधानपदाचा पहिला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले.
3. डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रातील नोकरी सोडली होती.
4. डॉ. मनमोहन सिंग यांना हिंदी वाचता येत नाही. त्यांची हिंदी भाषणंही उर्दू भाषेत लिहिलेली असतात.
5. डॉ. मनमोहन सिंग लहान असताना त्यांची एकंदरीतच परिस्थिती हालाखची होती. बालपणीचं आईचं छत्र हरपलं. त्यावेळी शिक्षण घेतानाही असंख्य अडचणींना ते सामोरे गेले. रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात ते अभ्यास करत.
6. पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या जगातील सर्व नेत्यांपेक्षा डॉ. मनमोहन सिंग हे सर्वाधिक शिक्षित आहेत.
7. 1991 सालापर्यंत डॉ. मनमोहन सिंग यांनी राजकारणात प्रवेश केला नव्हता. मात्र त्यानंतर नवनिर्वाचित पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यांच्याकडे अर्थमंत्रालयाची धुरा सोपवली व त्यांच्याच काळात भारताने जागतीकीकरणाची धोरणं अवलंबली.
8. जगातील 14 विद्यापीठांनी डॉ. मनमोहन सिंग यांना 'डी. लिट' ही मानद पदवी देऊन सन्मानित केले आहे.
9. डॉ. मनमोहन सिंग हे ज्यावेळी अमृतसरमधील महाविद्यालयात शिकवत होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांना राजकारणात येण्याची विनंती केली होती. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी विनंतीस विनम्रपूर्ण नकार दिला होता. प्रसिद्ध साहित्यिक मुल्क राज आनंद यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची पंडित नेहरुंशी भेट घालून दिली होती.
10. पंतप्रधान पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठात शिकवण्यास सुरुवात केली.
बर्थडे स्पेशल : डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 10 रंजक गोष्टी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Sep 2018 11:18 AM (IST)
जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस. पंतप्रधानपदावरुन डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांबद्दल जगभरात कौतुक केले जाते. मात्र, तरीही अनेक निर्णयांबाबत त्यांच्यावर वेळोवेळी टीकाही झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -