Temple accident in Thanjavur : तामिळनाडूच्या तंजावरमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. इथल्या एका मंदिरात मिरवणुकीदरम्यान करंट लागून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन बालकांचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार तंजावरमधील मंदिरात एका रथयात्रेदरम्यान ही दुर्घटना घडली. रथयात्रा सुरु असताना वीजेच्या तारेला स्पर्श झाल्यानं ही घटना घडली. अवघ्या क्षणात होत्याचं नव्हतं झालं अन् 11 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याची देखील माहिती आहे.





माहितीनुसार या दुर्घटनेत अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्याला सुरुवात केली.





मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश  
माहितीनुसार या मंदिरामध्ये 94 वा अप्पर गुरु पूजा उत्सवाचा कार्यक्रम सुरु होता. या उत्सवासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी झाली होती. रस्त्यावर पारंपारिक रथ यात्रेच्या वेळी एका वीजेच्या तारेला रथाचा स्पर्श झाला. यामुळं करंट उतरुन 11 जणांचा मृत्यू झाला. यात 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे. या दुर्देवी घटनेनं तामिळनाडूसह देशभरात खळबळ उडाली आहे.