Telangana Latest News : तेलंगणामध्ये (Telangana) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील सायबराबाद पोलिसांनी टीआरएसच्या (Bharat Rashtra Samithi) चार आमदारांना आमिष दाखवून घोडेबाजार केल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून 15 कोटी रुपये जप्त केले आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) दावा केला आहे की, भाजप त्यांचे आमदार विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. टीआरएस आमदार रेगा कंथा राव (TRS MLA Rega Kantha Rao), गुव्वाला बलराजू (Guvwala Balraju), बिरम हर्षवर्धन रेड्डी (Biram Harshvardhan Reddy) आणि पायलट रोहित रेड्डी (Rohit Reddy) यांना आमिष दाखवून विकत घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप आहे.


याप्रकरणाशी संबधित एक ट्वीट टीआरएस (Bharat Rashtra Samithi) नेते वाय सतीश रेड्डी (Satish Reddy) यांनी केला आहे. ते ट्वीट करत म्हणाले आहेत की, हेच खरे हिरो आहेत, ज्यांनी भाजपच्या वाईट राजकारणाची माहिती दिली. मुख्यमंत्री केसीआर (Cm KCR) यांच्या सतर्कतेला सलाम. टीआरएसच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, त्यांनी प्रत्येक आमदाराला 100 कोटी देणार असल्याचे आमीष दाखवले.


या प्रकरणी सायबराबादचे सीपी स्टीफन रवींद्र म्हणाले की, आम्हाला टीआरएस (Bharat Rashtra Samithi) आमदारांकडून माहिती मिळाली होती की त्यांना पैसे आणि पदांचे आमीष दाखवले जात आहे. आम्ही फार्महाऊसवर छापा टाकला आणि तीन जणांना तिथे पहिले. याप्रकरणी आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि आमीष दाखवल्या प्रकरणाची चौकशी करू.


याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबराबादमधील केएल विद्यापीठाजवळील अझीझ नगर येथील फार्महाऊसमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हे तिन्ही जण दिल्लीहून आले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाचा समावेश असून तो एका मोठ्या नेत्याच्या जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे.


दरम्यान, भाजपवर हा गंभीर आरोप अशा वेळी लागला आहे जेव्हा रापोलू आनंद भास्कर यांनी भाजपचा राजीनामा देऊन टीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. भास्कर यांच्या राजीनाम्यापूर्वी विधान परिषदेचे माजी अध्यक्ष स्वामी गौर आणि दुसरे नेते श्रावण दासोजू यांनी भाजप सोडून टीआरएसमध्ये प्रवेश केला.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Firecracker: प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णात होत आहे वाढ, फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मुंबई-पुण्यातील हवा गुणवत्तेवर परिणाम