Ktr On Elon Musk : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र आणि तेलंगणानाचे उद्योग व वाणिज्य मंत्री के. टी. रामा राव यांनी टेस्ला कंपनीचे सीईओ एलन (Elon Musk) मस्क यांना तेलंगणामध्ये टेस्लाचे प्रकल्प उभारण्याचे आमंत्रण दिले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मस्क यांनी टेस्लाला भारतात लॉंच करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे असे म्हटले होते. मस्क यांच्या या वक्तव्याला के. टी. रामा राव यांनी उत्तर देत टेस्लाचा प्रकल्प तेलंगणात उभारण्याचे आमंत्रण दिले आहे.
के. रामा. राव यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "ये एलन मी भारतातील तेलंगणा राज्याचा उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहे. टेस्लाचे प्रकल्प भारत/तेलंगणात उभा करताना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी टेस्लासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होईल. आमचे राज्य अनेक शाश्वत उपक्रमांमध्ये पुढे आहे आणि ते भारतातील सर्वोच्च व्यावसायिक ठिकाण आहे.
एलन मस्क यांनी एका भारतीय यूजरने ट्विटरवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले होते. एलन मस्क यांना ट्विटरवरून टेस्लाच्या भारतात येण्यावरून प्रश्न विचारण्यात आला होता. यावर टेस्लाचे सीईओ मस्क यांनी उत्तर दिले होते. "भारतात कार लॉंच करण्यासाठी आमच्या कंपनीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि सरकारसोबत चर्चा करून या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत."
आयात कर कमी करण्याची मागणी करत आहे टेस्ला
इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात कर कमी करण्याची मागणी टेस्ला भारत सरकारकडे करत आहे. परंतु, स्थानिक इलेक्ट्रिक कंपन्या टेस्लाच्या या मागणीला विरोध करत आहेत.
महत्वाच्या बातम्या