संपूर्ण भारतीय बनावटीच्या 'तेजस'ची आकाशझेप
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2016 09:08 AM (IST)
बंगळुरु : संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानाची पहिली बॅच आज हवाई दलात सहभागी झाली आहे. आज हवाई दलाच्या बंगळुरु येथील बेसवर छोटेखानी धार्मिक विधींसह हे लढाऊ विमान हवाईदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आलं. सुरुवातीला केवळ दोन विमानं हवाई दलाला मिळणार असली तरीही या वर्षअखेर ही संख्या 6 वर जाणार आहे. संपूर्ण भारतीय बनावटीच्या असलेल्या या विमानांचा तळ कोईंबतूर येथील शुलु या ठिकाणी करण्यात आलाय. हवाई दलाच्या मिग-21 या विमानांच्या जागी तेजस ही विमानं असणार आहेत. अद्याप या विमानाला ऑपरेशनल लायसन्स मिळालेलं नाहीये, पण हा परवाना मिळाल्यानंतर तेजस लवकर हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होईल.