पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेला डॉ. वीरेंद्र तावडे हा शस्त्रांचा छोटासा कारखाना उभारण्याच्या तयारीत होता. गोवा स्फोटातील आरोपी सारंग आकोलकर आणि तावडे यांच्यात ई-मेलवरुन संभाषण होतं होतं, अशी माहिती सीबीआयने दिली आहे.

 

 

तसंच मेलद्वारे दोघांमध्ये शस्त्रांच्या देवाण-घेवाणीबद्दलही चर्चा झाल्याचं सीबीआयने सांगितलं आहे. डॉ. वीरेंद्र तावडे आणि सारंग आकोलकर यांच्यातील 200 हून अधिक ई-मेलची तपासणी सध्या सीबीआयचे अधिकारी करत आहेत.

 

 

डॉ. नरेंद्र दाभोलकराच्या हत्येप्रकरणी तब्बल पावणे तीन वर्षांनंतर पहिली अटक करण्यात आली आहे. सनातन संस्थेशी संलग्नित असलेल्या हिंदू जनजागरण समितीच्या डॉ. वीरेंद्र तावडेला 10 जून रोजी सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने तावडेला 16 जूनपर्यंत सीबीआयची कोठडी सुनावली आहे.

 

 

20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकरांचा खून

 

 

डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात हत्या करण्यात आली होती. मात्र, याप्रकरणी तपास अतिशय संथ गतीने सुरु असल्यानं हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.

 

 

वीरेंद्र तावडेकडून काय माहिती मिळते, हे महत्त्वाचं ठरणार आहे. पानसरे आणि दाभोलकर या दोन्ही हत्येत अटक झालेल्या व्यक्ती सनातनशी संबंधित आहेत. हा दोन्ही हत्येतील समान दुवा आहे.

 



 

संबंधित बातम्या

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पहिली अटक


'सनातन' ही दहशतवादी संघटना, हिंदू समाजावर काळा डाग : आशिष खेतान


दाभोलकर हत्या प्रकरण: वीरेंद्र तावडेला 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडी