Monsoon : दरवर्षी 1 जून रोजी हजेरी लावणारा मान्सून यावर्षी एक दिवस आधीच केरळात दाखल होणार आहे. मान्सून यावर्षी सरासरी १०३टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, स्कायमेटने देखील 30 मे रोजीच मान्सून केरळात दाखल होणार असल्याचं म्हटलंय


प्रतीवर्षी सरासरी प्रमाणे १ जून रोजी मान्सून केरळात हजेरी लावत असतो. मात्र, यावर्षी एक दिवस आधीच तो दाखलहोण्याची शक्यता आहे. मात्र यंदा तोक्ते चक्रीवादळामुळे  तो आधीच दाखल होण्यचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामानविभागानं यंदा 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 


तोक्ते (Cyclone tauktae) चक्रीवादळाचा हा सकारात्मक परिणाम झाला आहे.  मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाल्यानं मान्सून लवकर दाखल होणार आहे. दर वर्षीच्या सरासरीनुसार केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांत राज्यात मान्सून दाखल होत असतो. त्यामुळं यंदाही 8 ते 10 तारखेदरम्यान तळ कोकणातमान्सून दाखल होईल. त्यानंतर 4-5 दिवसांत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्याअंदाजानुसार मान्सून केरळात धडकण्याची सरासरी तारीख 31 मे आहे. त्यात चार दिवस कमी किंवा जास्त होत असतात. 




सलग तिसऱ्या वर्षी देशभरात समाधानकारक पाऊस असेल, असा अंदाज 'स्कायमेट वेदर' या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेनं वर्तवला आहे. हवामान विभागानं यंदा चांगला पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून विभागाच्या मते यंदा  पाऊससरासरी 103 टक्के कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या संकटामुळं नागरिक, प्रशासन, सरकार सगळेच हैराण झाले आहेत. मात्र या संकटाच्या काळातहीसंपूर्ण देशाची घडी देशातल्या शेतकऱ्यामुळं काहीशी चांगली राहिली आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांसहअर्थव्यवस्थेला फायदा होईल.