तामिळनाडू: एआयएडीएमके+: 134, डीमके+: 98, भाजप: 0, अन्य: 0
-----------
234 जागा असलेल्या या विधानसभेमध्ये जयललितांच्या एआयडीएमकेने 135 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी आवश्यक 118 हा आकडा त्यांनी पार केला आहे.
दुसरीकडे त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एम करुणानिधी यांच्या 'द्रविड मुन्नेत्रा कळघम' अर्थात DMK ने 73 आणि काँग्रेसला 2 जागांवर आघाडी मिळाली. या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती.
LIVE: ममता, जयललितांना बहुमत
तामिळनाडूत यापूर्वी सलग दोनवेळा कोणत्याही सरकारने सत्ता स्थापन केली नव्हती. मात्र जयललितांनी हा इतिहास बदलला आहे. तामिळनाडूत भाजपला खातं खोलता आलेलं नाही.
आता केवळ अंतिम निकालाची प्रतिक्षा असून, कोण किती जागा मिळवतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.