दिसपूर :  पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत . मात्र भाजपचं सर्वाधिक लक्ष आसामवर आहे. आसाम हे भाजपसाठी का महत्त्वाचं आहे, यावर एक नजर -

 

  • आसाम म्हणजे Gateway of North East अर्थात ईशान्येचे प्रवेशद्वार .

  • आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागा आहेत.

  • गेली सलग 15 वर्ष आसाममध्ये तरुण गोगोईंच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता आहे.

  • सध्या आसाममधे भाजपकडे फक्त 5 जागा आहेत मात्र आजच्या 5 राज्यांपैकी भाजपला सर्वाधिक आशा आसामकडूनच आहेत.

  • सर्व एक्झिट पोल्सनी आसाममध्ये कमळ फुलणार असा अंदाज व्यक्त केलाय. (एबीपी आनंदा:- भाजप 81, काँग्रेस 33, एआययूडीएफ -10)

  • जुना मित्र असम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांच्या मदतीने बहुमत मिळवण्याची भाजपला आशा आहे

  • 2014 च्या लोकसभेत आसाममधील 14 पैकी 7 जागा भाजपने जिंकल्या होत्या तेव्हांपासूनच आसाम भाजपने ‘मिशन 84’ ची तयारी सुरु केली होती.

  • भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार सर्बानंद सोनोवाल आहेत.

  • सर्बानंद सोनोवाल सध्या केंद्रात मंत्री आहेत (Minister of State with Independent Charge for Youth Affairs and Sports )

  • आसाममध्ये बांग्लादेशी मुस्लिम घुसखोरांची समस्या हा कळीचा मुद्दा असतो, यावेळी त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

  • मुस्लिम मतांमुळे बद्रुद्दिन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटवर काँग्रेसचं गणित अवलंबून असतं, मात्र यंदा ध्रुवीकरणाचा फायदा भाजपला होऊ शकतो

  • आसाममध्ये आत्तापर्यंत फक्त 3 वेळा बिगरकाँग्रेसी सरकार आलं आहे

  • आसामच नव्हे तर ईशान्येकडील कोणत्याही राज्यात भाजपचं सरकार येण्याची ही पहिली वेळ असेल

  • मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असताना आसाम हातात आलं तर भाजपचं मनोधैर्य वाढेल.

  • भाजप आसाममध्ये सत्तेत आलं तर केंद्रीय मंत्रीमंडळातही छोटा बदल अपेक्षित कारण खेळ मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची जागा भरावी लागेल.