नवी दिल्ली: जलीकट्टू या बैलांच्या शर्यतीवर न्यायालयानं घातलेली बंदी उठवण्यासाठी तमिळनाडूत जोरदार आंदोलनं सुरु आहेत. ही बंदी उठवण्यात केंद्रानं हस्तक्षेप करावा अशी मागणी करत तमिळनाडूचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं मोदींनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.




दरम्यान जलीकट्टू सुरू करण्याची मागणी करत करण्यात आलेलं आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत चाललं आहे. आजही हजारो लोकांचा जमाव चेन्नईतील मरीना बीचवर जलीकट्टूसाठी आंदोलन करत होता.

दरम्यान संगीतकार ए आर रहमाननंही तमिळनाडूच्या स्पिरीटला दाद देण्यासाठी उद्या एक दिवसाचं उपोषण करत असल्याचं जाहीर केलं.