Tamil Nadu Rains :  तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.  राज्यात पाऊसामुळे झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापार्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याची स्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळ आज  तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचू शकते. या चक्रिवादळामुळे 9 राज्यांमध्ये रेड अलर्ट जाहिर करण्यात आला आहे. 


तमिळनाडूची राजधानी चेन्नई आणि आसपासच्या परिसरात पाऊसाच्या तुरळक सरी बरसल्यानंतर आता पुन्हा मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार,   चक्रीवादळ आज संध्याकाळी तमिळनाडू आणि  आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस  तमिळनाडूमधील विस्तृत भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


Rajasthan Accident: भयंकर! राजस्थानमध्ये भरधाव कारची रस्त्यावरील दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू, 8 जण जखमी


कुठे होऊ शकतो पाऊस 
हवामान विभागामने दिलेल्या माहितीनुसार, काही बागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. आज तिरुवल्लुर, कल्लाकुरिची, सेलम, वेल्लोर, तिरुन्नामलाई, रानीपेट  आणि तिरुपुत्तर या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये मुलळधार पाऊस पडू शकतो. तसेच  नीलगिरि, कोयंबटूर, चेंगापल्ट्टू, नमक्कल, तिरुचिरापल्ली, चेन्नई  आणि केंद्र शासित प्रदेश पुद्दुचेरी या भागांमध्ये पाऊस पडू शकतो. 


Nisha Dahiya : आपल्या मृत्यूच्या बातम्या या अफवा; आपण सुरक्षित असल्याचं पैलवान निशा दहियाचं स्पष्टीकरण


12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडूच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलच्या काही भागात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.


ईशान्य मान्सूनमुळे तामिळनाडूमध्ये 1 ऑक्टोबरपासून आत्ता पर्यंत नेहमीपेक्षा 50 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तमिळनाडूमधील 90 प्रमुख जलाशयांपैकी 53 जलाशयातील पाणीसाठा 76 टक्के झाला आहे. या कालावधीत तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये 38 सेमी पावसाची नोंद झाली आहे. जे 25 सेंटीमीटरच्या सामान्य पातळीपेक्षा 51 टक्के जास्त आहे.


UPSC Exams Tips: यूपीएससी परीक्षेची तयारी करताय? हिमांशू गुप्ता यांच्या विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स