BJP Tamil Nadu President Annamalai: तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu News) स्थलांतरित मजुरांवरील हल्ल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. तामिळनाडू (Tamil Nadu Police) पोलिसांनी मात्र यासंदर्भात सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारे व्हिडीओ आणि मेसेज खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचं स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी शनिवारी (4 मार्च) पोलिसांनी दोन पत्रकारांसह तिघांवर गुन्हा दाखल केला होता. तर दुसरीकडे, रविवारी (5 मार्च) सायबर क्राईम विभागानं (Cyber Crime Department) याच प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई (K Annamalai) यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. 


तामिळनाडू (Tamil Nadu) भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई (Tamil Nadu BJP President K Annamalai) यांच्यावर हिंसाचार भडकवण्याचा (Incite Violence) आणि दोन समुदायांमध्ये तेढ वाढवल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत भाजप बिहार (Bihar) ट्विटर अकाउंट होल्डरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांचा सीएम स्टॅलिन यांच्यावर आरोप


शनिवारी अण्णामलाई यांनी स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर एक निवेदन जारी केलं होतं. त्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की, "ते तामिळनाडूमध्ये सुरक्षित आहेत, परंतु मुख्यमंत्री स्टॅलिन यांचं सरकार त्यांच्याविरुद्ध द्वेष पसरवत आहे." अण्णामलाई यांनी बिहारमधील लोकांवरील हल्ल्यांच्या खोट्या बातम्या पसरवल्याचा निषेध केला आणि असं म्हटलं की, तामिळ नागरिक उत्तर भारतीयांविरूद्धच्या फुटीरतावादाचे समर्थन करत नाहीत.


द्रमुकच्या हिंदी विरोधी कारवाया


अण्णामलाई यांनी एका निवेदनात म्हटलंय की, "आम्ही तमिळ आमच्या उत्तर भारतीय मित्रांविरुद्ध फुटीरतावाद आणि द्वेष पसरवण्याचं समर्थन करत नाही. आश्रयासाठी तामिळनाडूमध्ये आलेल्या सर्वांचा स्विकार करतो आणि त्यांचा आमच्याच समाजाचा एक भाग म्हणून स्वीकार करतो." ते पुढे म्हणाले की, "द्रमुकच्या हिंदीविरोधी कारवायांपासून सुरू झालेली ही द्वेष मोहीम आता गरीब लोकांचं नुकसान करणाऱ्या पातळीवर पोहोचली आहे." 


राज्यपाल म्हणाले, घाबरण्याची गरज नाही 


तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी रविवारी राज्यातील काही स्थलांतरित कामगारांवर हल्ल्यांच्या कथित अफवांच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमधील स्थलांतरित कामगारांची भीती घालवण्याचा प्रयत्न केला. राज्यातील लोक चांगले आहेत. राजभवनाने तामिळ, इंग्रजी आणि हिंदीमध्ये पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कामगारांनी घाबरण्याची गरज नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Tamil Nadu: "कोणत्याही बिहारी मजुराच्या जीवाला धोका नाही"; कामगारांवरील हल्ल्याच्या अफवांवर तामिळनाडू सरकारचं स्पष्टीकरण