TN Exit Poll Result 2021 Time: पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये तामिळनाडूच्या निवडणुकीकडेही देशाचं लक्ष लागून आहे. तामिळनाडूचा निकाल काय असणार याकडे तामिळनाडूसह देशाचं लक्ष लागलं आहे. तामिळनाडूमध्ये  234 जागांसाठी एकाच टप्प्यात सहा एप्रिलला मतदान पार पडलं. राज्यात एकूण 71.43 टक्के मतदानाची नोंद झाली.  234 जागा असलेल्या तामिळनाडू विधानसभेत सत्ता काबिज करण्यासाठी  एआयएडीएमके, डीएमके आणि भाजपमध्ये मुख्य लढत होती.  


2016 मध्ये अशी होती स्थिती 
2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत एआयएडीएमकेनं जयललिता यांच्या नेतृत्वात विजय मिळवला होता. मात्र 5  डिसेंबर 2016 रोजी जयललिता यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर ओ पनीरसेल्वम तामिलनाडुचे मुख्यमंत्री झाले. मात्र  73 दिवसानंतर त्यांना खुर्ची सोडावी लागली.  16 डिसेंबर 2017 रोजी ई पलानीस्वामी राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच नेतृत्वात 2021 च्या निवडणुका लढल्या गेल्या.  


तामिळनाडुमधील काही प्रमुख लढती
इडप्पाडी, सेलम जिल्हा = पलानीस्वामी, अन्नाद्रमुक (मुख्यमंत्री) - टी संपत कुमार, डीएमके युवा नेता
बोडिनायाकन्नूर = ओ पन्नीरसेल्वम, एआईडीएमके (उपमुख्यमंत्री) - थंगा तमिलसेल्वन, डीएमतके
थाउसंड लाइट्स = खुशबू सुंदर (अभिनेत्री), बीजेपी - एन. एझिहन , डीएमके
कोलाथुर = एमके स्टालिन, डीएमके प्रमुख, - अधिराजराम , एआईडीएमके - ए जगदीश, एमएनएम
चेपॉक विधानसभा = डीएमके प्रमुख एमके स्टालिन के बेटे उदयनिधि - ए. कसाली , पीएमके
कोविलपट्टी = दिनाकरन, शशिकला यांचा भाचा - अन्नाद्रमुक के उम्मीदवार के राजू - डीएमके गठबंधन के श्रीनिवासन
कोईंबत्तूर दक्षिण = कमल हासन, मक्कल निधी मय्यम – वनाथी श्रीनिवासन, बीजेपी


पश्चिम बंगालसह पाच राज्यांचा एक्झिट  पोलचा निकाल आज, कुठं कुठं पाहता येणार?
West Bengal Exit Poll Result 2021: पश्चिम बंगालमध्ये आज आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांचं मतदान सुरु आहे. त्याआधी आसाम,केरळ, तामिलनाडु आणि पुद्दुचेरीमधील निवडणुका संपल्या आहेत. 2 मे रोजी बंगालसह सर्व राज्याच्या निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. मात्र त्याआधी एबीपी माझावर आपण एक्झिट पोलचे निकाल पाहू शकणार आहोत. या पाच राज्यांमध्ये कुणाचं सरकार येणार? याबाबत सर्वात सटीक असे एक्झिट पोलचे निकाल आज सायंकाळी पाच वाजेपासून एबीपी माझावर पाहू शकणार आहोत.  


कुठं कुठं पाहू शकता एक्झिट  पोल
टीव्हीसोबतच मोबाईल फोन आणि अन्य प्लॅटफॉर्मवर आपण टेक्स्ट, फोटो, व्हिडियोद्वारा माहिती सोबत ABP माझाच्या लाईव्ह टीव्हीवर हे एक्सिट पोलचे निकाल पाहू शकता.  लोकप्रिय व्हिडीयो स्ट्रीमिंग वेबसाईट आणि अॅप Hotstar वर देखील आपण पोलचं लाईव्ह कव्हरेज पाहू शकाल. सोबतच आपण एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा निकाल पाहू शकाल. आपण आपल्या एंड्राईड तथा आयओएस स्मार्टफोनमध्ये ABP Live अॅप इंस्टॉल करुन लाईव्ह टीव्हीवर हे कव्हरेज पाहू शकाल तसेच यासंबंधीत स्टोरीज वाचू शकाल. 


कुठं कुठं पाहू शकता एक्सिट पोल


लाईव्ह टीव्ही: https://marathi.abplive.com//amplive-tv/amp 
मराठी वेबसाइट: https://marathi.abplive.com//amp 
इंग्रजी वेबसाइट: https://news.abplive.com//amp 

Youtube
-


हिंदी यूट्यूब: https://www.youtube.com/channel/UCmphdqZNmqL72WJ2uyiNw5w 
इंग्रजी यूट्यूब: https://www.youtube.com/user/abpnewstv 
मराठी युट्युब: https://youtube.com/c/abpmajhatv 


हिंदी फेसबुक अकाउंट: facebook.com/abpnews 
इंग्रजी फेसबुक अकाउंट: facebook.com/abplive 
मराठी फेसबुक अकाउंट: https://www.facebook.com/abpmajha 


ट्विटर हॅंडल: https://twitter.com/abpmajhatv?s=09 
इंस्टाग्राम: https://instagram.com/abpmajhatv?igshid=mddulihsde0q