मुंबई : आयकर विभागने बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरी आणि कार्यालयावर छापेमारी केली. अद्यापही आयकर विभागाकडून तिची चौकशी सुरु आहे. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू तपास यंत्रणेला कोट्यवधी रुपयांचा हिशेब देण्यास असमर्थ असल्याचं आयकर विभागने म्हटलं आहे. आयकर विभागाच्या कारवाईनंतर तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे तापसी आणि तिचे कुटुंबीय नाराज आहेत. दरम्यान तापसीने तीन ट्वीट करून आपली बाजू माडंली आहे.


तापसीने नाराजीच्या सुरात ट्वीट करत अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तिने पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले की, "उन्हाळ्याच्या सुट्ट्या येत असल्याने पॅरिसमध्ये बंगला खरेदी करण्याचा सर्वात मोठा आरोप माझ्यावर झाला आहे.





Taapasee Pannu Raid | अनुराग आणि तापसीची 38 तासांपासून चौकशी; दोघांचेही लॅपटॉप, मोबाईल आयकर विभागाच्या ताब्यात


दुसर्‍या ट्वीटमध्ये तापसीने लिहिलं की, "माझ्यावर भविष्य घडवण्यासाठी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारण मी यापूर्वी पैसे घेण्यास नकार दिला होता."





तिसर्‍या ट्वीटमध्ये, तापसीने लिहिलं की, "आमच्या सन्माननीय अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 2013 च्या छाप्याच्या आठवणी ताज्या झाल्या ज्या माझ्यासोबत घडल्या. पुढे तापसीने म्हटलं की, "आता मी स्वस्त राहिली नाही." कंगनाने सुरुवातीच्या वादादरम्यान तापसीला 'सस्ती कॉपी' म्हटलं होतं.





अनुराग-तापसीची आयकर विभागाकडून कसून चौकशी, रात्रभर छापेमारी सुरु


नुकत्याच झालेल्या आयकर विभागच्या छापेमारीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं होतं की, मी कुठल्याही खटल्याचा उल्लेख करणार नाही किंवा कोणाचेही नाव घेणार नाही. पण जेव्हा आमच्या सरकारच्या काळात अशी कारवाई होते तेव्हा प्रश्न उपस्थित होऊ लागतात. मात्र 2013 मध्ये एखाद्यावर कारवाई केली गेली होती, तर मग कुणीही प्रश्न उपस्थित का केला नाही.