नवी दिल्ली: देशात एक मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येत आहे. देशात आतापर्यंत एक कोटी 90 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल आहे.


देशात 16 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारील आणि फ्रन्टलाईन वर्कस यांना कोरोनाची लस देण्यात आली. देशात आता कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून त्यामध्ये 60 वर्षापरील नागरिक आणि ज्या लोकांना गंभीर असे आजार आहेत अशा 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. देशात 5 मार्चच्या संध्याकाळपर्यंत एक कोटी 90 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलंय.


या आधी गुरुवारी देशात सर्वात जास्त कोरोनाच्या लसी देण्यात आल्या. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी 40 टक्के अधिक लसी देण्यात आल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय. कोरोनाच्या लसीकरणाच्या आकडेवारीत भारत आता जगात दोन नंबरला आला असून पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. भारतात आता कोरोनाचा दुसरा डोस देण्यासही सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या लसीकरणाच्या आकडेवारीत अमेरिका, भारत या देशांनंतर ब्रिटन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.


Corona : कोरोना वाढतोय! महाराष्ट्रात पाच महिन्यानंतर एका दिवसात 10 हजार कोरोनाबाधित


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात 60 वर्षावरील आणि ज्यांना गंभीर आजार आहे अशा 45 वर्षावरील 60,17,862 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 3,13,226 लोकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. शुक्रवारी एकूण 10,34,672 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली असून त्यामध्ये 8,25,537 लोकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.


कोरोना लसीकरणासाठी कोरोनाच्या संकेतस्थळावर (http://cowin.gov.in) नोंद करणं गरजेचं आहे. तसेच आरोग्य सेतू आणि कॉमन सर्व्हिस अॅपच्या माध्यमातून कोविन या अॅपवर नोंद करता येते. सरकारच्या या अॅपवर आणि संकेतस्थळावर नोंदणी करताना लोकांनी गर्दी केल्याने काही काळ या अॅप आणि संकेतस्थळाच्या कामामध्ये अडथळा आल्याचंही पहायला मिळालं.


लसीकरणासाठी एखादी व्यक्ती कोणत्याही राज्यात आपले नांव नोंद करु शकते. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस ही 250 रुपयांना मिळणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत मिळणार आहे.


Coronavirus | एअरलॉक केबिनमध्ये जाऊन किंचाळा किंवा गाणे गा, केवळ तीन मिनीटात होणार कोरोनाचे निदान; डच शास्त्रज्ञाचा नवा अविष्कार