नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal Assault Case) यांनी त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी विभव कुमार यांच्याविरोधात जबाब नोंदवला आहे. 13 मे रोजी नेमकं काय झालं, त्या घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी दिल्ली पोलिसांना दिली. त्यानंतर आता पोलिस या प्रकरणाचा तपास सुरू करणार आहेत.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती मालीवाल यांनी सोमवारी, 13 मे रोजीची संपूर्ण घटना त्यांच्या जबाबात सांगितली. त्यांनी कोणत्या परिस्थितीत पीसीआर कॉल केला याची माहिती पोलिसांना दिली. त्यांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली. आपच्या राज्यसभा खासदारांनी स्पेशल सेलचे अतिरिक्त सीपी प्रमोद कुशवाह आणि अतिरिक्त डीसीपी उत्तर अंजीता यांच्यासमोर त्यांचा जबाब नोंदवला.
त्या दिवशी नेमकं काय झालं?
स्वाती मालीवाल जेव्हा मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचल्या तेव्हा मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. यानंतर स्वाती मालीवाल यांनी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाणे गाठले. तेथे त्यांनी कोणतीही लेखी तक्रार दिली नव्हती. या घटनेनंतर आम आदमी पक्षानेही प्रतिक्रिया दिली होती. ही घटना निंदनीय असून मुख्यमंत्री याप्रकरणी कारवाई करतील असंही आपकडून स्पष्ट करण्यात आलं.
आपचे खासदार संजय सिंह यांनीही स्वाती मालीवाल यांची भेट घेतली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) विभव कुमार यांना समन्स बजावले आहे. शुक्रवारी (17 मे) NCW या प्रकरणी सुनावणी करणार आहे.
कोण आहे विभव कुमार?
विभव कुमार हे बिहारमधील सासाराम येथील रहिवासी आहे. त्यांनी बीएचयूमधून शिक्षण घेतले आहे. या आधी ईडीने दिल्लीतील अनेक बाबींची संबंधित त्यांची चौकशी केली आली. अण्णांच्या आंदोलनापूर्वीपासून ते अरविंद केजरीवाल यांच्याशी जोडले गेले होते. ते इंडिया अगेन्स्ट कॅप्शन मोहिमेशी सुरुवातीपासूनच संबंधित होते.
ही बातमी वाचा: