सुषमा स्वराज पतीला ट्विटरवर फॉलो करतात, मात्र मिस्टर स्वराज पत्नीला फॉलो करत नसल्याचं पाहून ट्विटराईट्सनाही आश्चर्य वाटलं. काही जणांनी याबाबत थेट स्वराज कौशल यांनाच प्रश्न विचारला असता, त्यांना मिळालेलं उत्तरही मजेदार आहे. तुम्ही पत्नी सुषमा स्वराज यांना का फॉलो करत नाही, या प्रश्नावर 'कारण मी लिबिया किंवा येमेनमध्ये अडकलेलो नाही' असं उत्तर त्यांनी दिलं.
यापूर्वीही स्वराज कौशल यांना एका यूझरने हाच प्रश्न विचारला होता. त्यावर 'मी तिला 45 वर्ष फॉलो करत आलो आहे. आता काही बदलू शकत नाही' असं मार्मिक उत्तर त्यांनी दिलं.
यापूर्वी एका तरुणीने कौशल यांना ट्वीट केलं होतं. 'सुषमाजींची मी खूप मोठी चाहती आहे. मात्र त्यांनी मला ब्लॉक केलं आहे. प्लीज मला अनब्लॉक करायला सांगा' या ट्वीटलाही मिस्टर स्वराज यांनी मजेदार उत्तर दिलं होतं. 'मी ती रिस्क घेऊ शकत नाही, कदाचित ती मलाही ब्लॉक करेल' अशी फटकेबाजी करत स्वराज कौशल यांनी ट्विटराईटलाच निरुत्तर केलं.