नवी दिल्लीः नागरिक हल्ली आपल्या तक्रारी संबंधित दुतावासाकडे देण्याऐवजी थेट परराष्ट्र मंत्र्यांकडेच मांडत आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी परदेशात अडचणीत असलेल्या अजून एका भारतीयाला मदत केली आहे.

https://twitter.com/shadabmoizee/status/765554585792569344

हज यात्रेला जात असलेल्या प्रवाशाने मक्का येथून मदिनासाठी निघालो आहे, मात्र 40 डीग्री तापमान असताना बसमध्ये एसी नाही आणि पाणीही नाही, काही झालं तर याला जबाबदार कोण, असं ट्वीट स्वराज यांना केलं होतं. स्वराज यांनी तातडीने त्याची दखल घेत मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

https://twitter.com/SushmaSwaraj/status/765590446617735168

स्वराज यांनी यापूर्वीही एका हनिमूनला निघालेल्या जोडप्याला मदत केली होती. एक दाम्पत्य हनिमूनला निघालं असता पत्नीचा अचानक पासपोर्ट हरवला, त्यामुळे हे गाऱ्हाणं थेट स्वराज यांच्याकडं मांडण्यात आलं. स्वराज यांनी तातडीने मदतीचं आश्वासन दिलं.